Join us  

बायकोनं मंगळसूत्र न घालणं नवऱ्याचा मानसिक छळ? घटस्फोटासाठी सबळ कारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 3:25 PM

Removal Of Mangal sutra By Wife is Mental Cruelty according to Court : मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर समाजमाध्यमात अनेक मतमतांतर दिसत आहेत, चर्चा आहे स्वातंत्र्य आणि मानसिक छळाची?

ठळक मुद्देमंगळसूत्र घातलं नाही तर पतीचा छळ होतो हेच अनेकांना हास्यास्पद वाटलं.पत्नी नांदायलाही येत नाही, मंगळसूत्रही घालत नाही. पतीचा छळ करते असे पतीच्या वकिलांनी या खटल्यात सांगितले. 

आपण नक्की कोणत्या काळात राहतो आहे? बायकोनं मंगळसूत्र घालायचं की नाही, तिनं ते काढलं तर नवऱ्याचा छळ कसा काय होतो? बायकांना स्वातंत्र्य आहे का? लग्न झाल्याची प्रतीकं घालणं बायकांनाच का सक्तीचं? अशा अनेक प्रश्नांचा भोवरा सोशल मीडीयात भयानक वेगानं फिरताना दिसला. अनेक महिलांनी तर आपला संताप व्यक्त केलाच, अनुभव लिहिलेच पण पुरुषांनीही मंगळसूत्र घालणं न घालणं हे मानसिक छळाशी जोडणं हे चुकीचं आणि हास्यास्पद असल्याचं म्हंटलं. निमित्त होतं मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्यात घटस्फोट मान्य करताना दिलेला निकाल. नवरा जिवंत असताना पत्नीनं मंगळसूत्र काढून ठेवणं, न घालणं हा नवऱ्याचा अतीक्रुर मानसिक छळ असल्याचं न्यायालयानं म्हंटलं असल्याचं यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या सांगतात (Removal Of Mangal sutra By Wife is Mental Cruelty according to Court).

(Image : Google)

मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला. न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात पतीला घटस्फोट मान्य करताना मंगळसूत्र पत्नीनं न घालण्यासंदर्भात मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. याप्रकरणी स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा १५ जून २०१६ रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. २०११ पासून हे जोडपे विभक्त राहत होते. आणि पत्नी नांदायलाही येत नाही, मंगळसूत्रही घालत नाही. पतीचा छळ करते असे पतीच्या वकिलांनी या खटल्यात सांगितले. 

(Image : Google)

पत्नीच्या वकिलांनी म्हंटले की तिनं हे मंगळसूत्र बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं आहे. मात्र हिंदू धर्मात पती जिवंत असताना मंगळसूत्र काढणे योग्य नसून ते केवळ पतीच्या मृत्यूनंतरच काढून टाकले जाते. त्यामुळे अशाप्रकारे मंगळसूत्र काढून टाकने हे एकप्रकारचे मानसिक क्रौर्य आहे असं न्यायालयानं म्हंटलं आहे. या साऱ्यानंतर सोशल मीडीयात बराच गदारोळ झाला. मंगळसूत्र घातलं नाही तर पतीचा छळ होतो हेच अनेकांना हास्यास्पद वाटलं. अनेक महिलांनी आपले अनुभव लिहिले. मंगळसूत्र घालण्याची सक्ती समाज कसा करतो, कुटुंब-नातेवाईक कसे छळतात याच्या कहाण्याही लिहिल्या. अनेकांनी संताप व्यक्त केला. चार भिंतीतला एक प्रश्न समाजाच्या पटलावर असा वाद बनून आला.

टॅग्स :रिलेशनशिपघटस्फोटन्यायालय