Join us  

लग्न झाल्यानंतरही किती लोक पार्टनरसोबत करतात 'बेवफाई'? भारतीय लोकांची आकडेवाडी पाहाल तर..... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 3:04 PM

Relationship: लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोसोबत किंवा नवऱ्यासोबत धाेका करत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या भारतीयांचं प्रमाण बघा किती....

ठळक मुद्देमोठ्या शहरांमध्ये घटस्फोटांचं प्रमाणही वाढत चाललं असून पार्टनरचे विवाहबाह्य संबंध असणं हे घटस्फोट होण्यामागचं महत्त्वाचं कारण बनलं आहे. 

प्रेमप्रकरणं, ब्रेकअप्स या संकल्पना आता अजिबात नव्या राहिलेल्या नाहीत. अगदी हायस्कूलमधली मुलंही हल्ली प्रेमात पडण्याचा, ब्रेकअप होण्याचा अनुभव घेतात. तिथपासून जे सुरुवात होते ते त्यांचं लग्न होईपर्यंत अनेकांनी कित्येकदा प्रेमात पडण्याचा आणि ब्रेकअप होण्याचा अनुभव घेतलेला असतो. लग्न झाल्यानंतर हे सगळं थांबेल असं वाटतं. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होत नाही. लग्नानंतरही ते त्यांच्या पार्टनरला धोका देतात आणि विवाहबाह्य संबंध ठेवतात. असं करणाऱ्या भारतीय लोकांचा अभ्यास एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲप ग्लीडन यांच्यातर्फे करण्यात आला असून त्यातून समोर आलेले निष्कर्ष विवाहसंस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. 

 

विवाहबाह्य संबंधाबाबत काय सांगतो अहवाल?

ग्लीडन ॲपने भारतातील मेट्रो सिटी आणि महानगरांमध्ये राहणाऱ्या जवळपास दिड हजार विवाहित लोकांचा अभ्यास केला होता. ते सगळे जण साधारण २५ ते ५० या वयोगटातील होते. aajtak.in यांनी दिलेल्या वृत्तानुसार या लोकांपैकी ६० टक्के लोक विवाहबाह्य संबंधात अडकलेले होते.

बघा माय- लेकीची भन्नाट मजेशीर सवारी, घरबसल्याच लेकीला घडवली सहल- बघा व्हायरल व्हिडिओ

काही निव्वळ टाईमपास म्हणून तर काही सिरिअस रिलेशनशिपमध्ये होते. या अभ्यासातून असंही लक्षात आलं आहे की त्यापैकी जवळपास ३५ टक्के पुरुषांना आणि तेवढ्याच प्रमाणात स्त्रियांनाही ऑनलाईन पद्धतीने फ्लर्टिंग करण्यात इंटरेस्ट असून ते आपल्या पार्टनरशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचार करण्यात अधिक उत्सूक आहेत.

 

विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण हल्ली मोठ्या शहरांमधून वाढत चालले आहे. त्यालाच रिलेशनशिप, सिच्युएशनशिप, ऑफिसवाईफ अशा अनेक नावांचं लेबलिंग केलं जात आहे.

बाग सदाबहार राहण्यासाठी ट्विंकल खन्ना करते 'हा' उपाय, बघा रोपं हिरवीगार ठेवण्याची सोपी ट्रिक

विशेष म्हणजे काही वर्षांपर्यंत असं केवळ महाविद्यालयीन तरुण मुलांमध्ये दिसून यायचं. ते आता लग्नानंतरही कायम राहात आहे. मोठ्या शहरांमध्ये घटस्फोटांचं प्रमाणही वाढत चाललं असून पार्टनरचे विवाहबाह्य संबंध असणं हे घटस्फोट होण्यामागचं महत्त्वाचं कारण बनलं आहे.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप