प्रेम आंधळं असतं हे अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. काहीही संबंध नसताना एकमेकांपासून दूरवर राहत असतानाही लोकांचे प्रेमसंबंध जुळतात आणि लग्नाचा विचार केला जातो. प्रेम हे कोणत्याही वयात, कोणावरही होऊ शकतं कारण प्रेमाला कसलंच बंधन नसतं. तुम्ही आतापर्यंत अशी अनेक कपल्स पाहिले असतील त्यांच्यात १० ते १५ वर्षांचे अंतर आहे. (Rickshaw driver and girl passenger marriage) सोशल मीडियावर अशीच एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. या कपल्समधील वयाचं अंतर एक दोन वर्षाचं नाही तर तब्बल ४१ वर्षाचं आहे. हे जोडपं पाकिस्तानातील असून संपूर्ण जगभरात यांची लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. (Rickshaw driver and girl passenger marriage in pakistan unique love story viral on social media)
सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे?
पाकिस्तानमधील रहिवासी युट्यूबर सय्यद बासिक अलीनं या जोडप्याची मुलाखत घेतली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. पतीचं वय ६० वर्ष असून पत्नीचं वय १९ वर्ष आहे. या दोघांमध्ये ४१ वर्षाचं अंतर आहे.
वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video
सय्यद बासित अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय पतीचे नाव शकील आहे, तर 19 वर्षीय पत्नीचे नाव समीना आहे. त्याची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. शकील रिक्षा चालवतो आणि ही रिक्षा चालवत असताना समीना त्याच्या प्रेमात पडली आणि मग त्याने प्रपोज केले.
शकील सांगतात की, ''रिक्षा चालवताना एकदा त्यांची भेट समीनाशी झाली. ते आपल्या रिक्षातून समिनाला घेऊन जात होते. पण रस्त्यात मध्येच रिक्षा खराब झाली. यावेळी त्यांनी समीनाला सांगितलं की पैसे नको देऊ आणि दुसऱ्या रिक्षानं घरी जा. पण समीनानं त्यांना रिक्षाच्या प्रवासाचेच नाही तर रिक्षा रिपेअर करण्यासाठी लागणारे पैसेही दिले. त्यानंतर त्यांनी पुढचे २ ते ३ महिने समिनाकडून रिक्षाच्या प्रवासाचे पैसे घेतलेच नाही. यादरम्यान दोघांमध्ये संभाषण वाढलं. मैत्रीचं प्रेमात रुपातंर झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.''