Lokmat Sakhi >Relationship > अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

4th Anniversary of Virat Kohli and Anushka Sharma: ॲनिव्हर्सरी, वाढदिवस यांचं सेलिब्रेशन (celebration) म्हणजे कधी कधी मनावरचा ताण कमी करणारा प्रेमाचा सुपर डोसही असू शकतो... हे नुकतंच दिसून आलं आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनवरून... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 04:06 PM2021-12-12T16:06:37+5:302021-12-12T16:08:06+5:30

4th Anniversary of Virat Kohli and Anushka Sharma: ॲनिव्हर्सरी, वाढदिवस यांचं सेलिब्रेशन (celebration) म्हणजे कधी कधी मनावरचा ताण कमी करणारा प्रेमाचा सुपर डोसही असू शकतो... हे नुकतंच दिसून आलं आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनवरून... 

Romantic celebration of anniversary by Virat Kohli and Anushka Sharma, these things can refresh your relation | अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

Highlightsछोट्या छोट्या गोष्टींमधूनही नात्याला खुलवता येतं.म्हणूनच तर संसारी झाल्यावरही नात्यातला रोमान्स टिकवून ठेवायचा असेल तर या काही गोष्टी करायला काहीच हरकत नाही...

नेमेची येतो पावसाळा... या उक्तीप्रमाणे लग्नाचे वाढदिवस, स्वत:चे आणि जोडीदाराचे वाढदिवस नेहमीच येतात... पण नेहमी येणाऱ्या असल्या तरी या गोष्टी प्रत्येकासाठीच खूप खास असतात. त्यामुळेच तर यांचं वेगळेपण जपून आणि टिकवून ठेवता आलं पाहिजे. मनावर कितीही ताण- तणाव असेल, डोक्यामागे असंख्य प्रश्नांचा भुंगा असेल तरी नात्यातला ओलावा टिकवून ठेवायचा असेल तर जोडीदारासह या काही क्षणांचा आनंद घेतलाच पाहिजे आणि त्यालाही तो आनंद भरभरून दिलाच पाहिजे.. हीच तर प्रेमातही जिंदादिली दाखविली आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी (4th anniversary celebration of Virushka)....

 

सध्या विराट कोहली (cricketer Virat Kohli) त्याच्या करिअरच्या कोणत्या टप्प्यावरून जात आहे, हे तर अवघा देशच काय जगभरातले त्याचे चाहते चांगले जाणून आहेत. नुकतंच कप्तानपद हातातून गेलं... यासोबतच त्याच्या कारकिर्दीत सध्या अनेक चढउतारही सुरु आहेत. असं असतानाही त्याने त्याची ॲनिव्हर्सरी अगदी रोमॅण्टीक पद्धतीने साजरी केली. कारण कधी कधी सेलिब्रेशन हेच तर मनावरचा सगळा ताण घालविण्यासाठीचं उत्तम औषध ठरत असतं, हेच विराटकडे पाहून जाणवून गेलं. त्यांची डिनर डेट (dinner date) आणि लाडकी पत्नी अनुष्कासाठी त्याने लिहिलेली पोस्ट (anniversary post) सध्या सोशल मिडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.

 

म्हणूनच तर स्पेशल प्रसंगी सेलिब्रेशन झालंच पाहिजे... लग्नाला झाली आता चार- पाच वर्षे, मुलं- बाळंही झाली... आता कसंली ॲनिव्हर्सरी असा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा... नात्यातला ओलावा संपून ते नातं कोरडं, शुष्क तर हाेत नाहीये ना, याचा पुन्हा एकदा विचार करा. नातं जुनं झालं असलं तरी त्यात नक्कीच नाविण्य आणता येतं... (Ideas that can refresh your relation in marathi) खूप भरमसाठ पैसा खर्च करण्याची अजिबातच गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही नात्याला खुलवता येतं. म्हणूनच तर संसारी झाल्यावरही नात्यातला रोमान्स टिकवून ठेवायचा असेल तर या काही गोष्टी करायला काहीच हरकत नाही...

 

१. फुलं तर नक्कीच देऊ शकता..
नवरा असो किंवा बायको, दोघांपैकी कोणीही एकमेकांना एखादं गुलाबाचं फुल किंवा आवडत्या फुलांचा गुच्छ दिला, तरी नक्कीच जोडीदार मनोमन सुखावून जातो. फुलांमधला रसरशीत आणि टवटवीतपणा नात्यामध्ये थोडा फार का होईना पण नक्कीच झिरपतो.. म्हणूनच तर फुलं देण्यासाठी ॲनिव्हर्सरीचीच वाट बघत बसण्याची काही गरज नाही. महिन्यातून एखाद्या वेळी कधीही जोडीदारासाठी फुलं घेऊन जा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपा.. 

२. जोडीदाराचं कौतूक करा..
लग्नाला चार- पाच वर्ष झाली की जोडीदाराला काय चांगलं जमतं किंवा काय जमत नाही, याचा चांगलाच अंदाज आलेला असतो. चांगल्या गोष्टींचं कौतूकही करून झालेलं असतं. पण तरीही नातं आनंदित ठेवायचं असेल तर जोडीदाराच्या दिसण्याचं, त्याच्या असण्याचं किंवा त्याच्या एखाद्या गोष्टीचं कौतूक करायला विसरू नका.. कौतुकाचा शिडकावा कुणाला आवडत नाही.. त्यामुळे जोडीदाराचं कौतूक करताना मुळीच कंजुषी नको.

 

३. ट्रिपला जा...
दुसऱ्या गावी जाऊन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणं हे आजकाल खूप ट्रेण्डी आहे. एकमेकांसोबत वेळ घालविण्याचा, एकमेकांना नव्याने ओळखण्याचा हा सगळ्यात भन्नाट मार्ग. त्यामुळे खूप खर्चिक ठिकाणी न जाता जवळपास कुठेतरी व्हॅकेशन ट्रिप प्लॅन करा.. बघा तुमच्यासकट तुमचं नातंही रिफ्रेश होऊन जाईल...

 

Web Title: Romantic celebration of anniversary by Virat Kohli and Anushka Sharma, these things can refresh your relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.