Join us  

Romantic relationship : रोमँटिक रिलेशनशिपमुळे शारीरिक अन् मानसिक आरोग्यही राहतं उत्तम; जाणून घ्या कसं ते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:58 PM

Romantic relationship : आता विज्ञानानेही हे मान्य केलंय की हृदयासाठी रोमँटिक रिलेशन्स फायदेशीर ठरतात. 

प्रेमात व्यक्तीला संपूर्ण जगाचा विसर पडतो. आयुष्य खूप सकारात्मक, इन्टरेस्टिंग वाटू लागतं, दिवस कधी, कसे  निघतात कळतं नाही. बोअरींग आयुष्यात उत्साह येतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण  चांगल्या रिलेशनशिपचा माणसांच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. आता विज्ञानानेही हे मान्य केलंय की हृदयासाठी रोमँटिक रिलेशन्स फायदेशीर ठरतात. 

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील हृदयरोगतज्ज्ञ (cardiologist) डॉ. विवेक महाजन (Dr Vivek Mahajan) आणि फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) डॉ. केदार तिलवे (Dr Kedar Tilwe) यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तुम्ही प्रेमळ, हेल्दी रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम दिसून येतो. 

प्रेम आणि आकर्षण हे दोन टप्प्यात विभागले गेले आहे. 

१) प्रारंभिक आकर्षण टप्पा

आपलं शरीर नॉरपेनेफ्रिन आणि एड्रेनालाईन सारखी संप्रेरके तत्काळ प्रतिक्रिया म्हणून सोडते, जे आपल्याला उत्तेजित करते. हृदयाचे ठोके वाढतात, नाडीचे दर वाढतात आणि आपण प्रेमानं आकर्षित होऊन त्या व्यक्तीकडे पाहतो.

२) दीर्घकाळ टिकणारे प्रेमसंबंध

आपण त्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखल्यानंतर आणि त्याच्याशी भावनिकरित्या जोडलेले वाटल्यानंतर. आपला मेंदू एंडोर्फिन, वासोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन सोडतो. ही संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असलेली संप्रेरके आहेत. डॉक्टर म्हणतात की एंडोर्फिन आपल्याला आनंद आणि समाधानाची भावना देतात. तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला सुरक्षित वाटते.

ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन दोन व्यक्तींमध्ये बंध निर्माण करण्यास मदत करतात. ही रसायने पालक आणि मुलाच्या संबंधासाठी जबाबदार असतात. हे हार्मोन्स एखाद्याच्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी देखील जबाबदार असतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एंडोर्फिनमुळं आपण आनंद आणि समाधान अनुभवतो. जेव्हा आपल्याला आपल्या खास व्यक्तीसह सुरक्षितता वाटत असते, तेव्हा असं होतं. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन दोन व्यक्तींमधील संबंध विकसित करण्यास मदत करतात. हे केमिकल आई-वडील आणि मुलांमधील संबंधांसाठीही जबाबदार असतात.

हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम

हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही संप्रेरकंच जबाबदार असतात. विज्ञानानुसार जेव्हा लोक त्यांच्या आवडत्या पार्टनरसोबत वेळ घालवतात, तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सुरक्षित असते. जीवनही तुलनेने अधिक आरामदायक असते.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य