आजपासून व्हॅलेंटाईन (Valentine week) वीक सुरू झाला आहे. प्रेमात असणारे विशेषतः फेब्रुवारी महिन्याची वाट पाहतात, कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत दररोज वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त केले जाते. व्हॅलेंटाईन वीक हा तरूणांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजेच रोझ डे (Rose Day) आज ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. (Rose day 2022 valentine week know about the meaning of different colors of roses)
रोज डे ला लोक आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक गुलाब प्रेमाचा एकच संदेश देत असला तरी तसं नाही. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांमुळे, भावनांचा अर्थ देखील बदलतो. म्हणूनच या लेखात तुम्हाला गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ सांगणार आहोत.
वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी
व्हॅलेंटाइन वीक सुरू होताच बाजारात गुलाबांच्या किमती वाढतात आणि त्याच्या किमती गगनाला भिडू लागतात. रोज डे च्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रेम व्यक्त केले जाते आणि त्यासाठी वेगवेगळे गुलाब दिले जातात. गुलाबाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना दर्शवतो. लोक त्यांच्या मित्रांना, शिक्षकांना, वरिष्ठांना फुले देऊन आपुलकी आणि आदर व्यक्त करतात. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. पिवळा आणि गुलाबी मैत्रीचे प्रतीक आहे आणि लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकमध्ये लाल गुलाबाची किंमत सर्वाधिक असते.
किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट
व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाचे महत्त्व खूप वाढते. गुलाबाचा प्रत्येक रंग काही ना काही सांगतो जो तुमच्या भावना दर्शवतो. जेव्हा तुम्हाला एखाद्याला गुलाब द्यायचा असेल तेव्हा तुम्ही कोणत्या भावनेने हा गुलाब देत आहात याची विशेष काळजी घ्या, कारण तुमच्या गुलाबाचा रंग तुमच्या भावना सांगेल.
लाल गुलाब
लाल गुलाब हे खरे प्रेम दर्शवते. रोज डे च्या दिवशी सर्वाधिक लाल गुलाब विकले जातात. या दिवशी आपले प्रेम व्यक्त केले जाते. याशिवाय लाल गुलाब आदर, उत्कटता आणि उत्साह देखील दर्शवतो.
गुलाबी रंग
गुलाबी गुलाब हे सौंदर्य आणि अभिजाततेचे प्रतीक मानले जाते. फिकट गुलाबी रंगाचे गुलाब सहानुभूती व्यक्त करण्यासाठी दिले जाते आणि गडद गुलाबी रंगाचे गुलाब कृतज्ञतेशी संबंधित आहेत.
लेव्हेंडर रंग
या रंगाचं गुलाब जादू किंवा मोहाशी संबंधित आहेत. जर कोणी पहिल्याच नजरेत कोणाच्या प्रेमात पडले असेल तर तो त्या व्यक्तीला हे गुलाब भेट देऊ शकतो.
पांढरं गुलाब
पांढरे गुलाब साधेपणा आणि शुद्धतेशी संबंधित आहेत. एखाद्याला पांढरे गुलाब देणे म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर दाखवणे.
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी हे तरुण प्रेमाचे किंवा साधेपणाचे प्रतीक मानले जाते. पूर्ण फुललेला गुलाब तुमच्या विकसित प्रेमाचा पुरावा आहे. तसेच दोन गुलाबाच्या कळ्यांसह पूर्ण फुललेला गुलाब, तुमच्या गुप्त प्रेमाचे प्रतीक आहे.