प्रेम म्हटलं की एकमेकांना भेट वस्तू देणं आलंच. पिढ्यानुपिढ्या वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट्स दिली जात आहेत. आजोबांनी आजीला कधी साडी घेऊन दिली असेल. (Rose Day 2025- Why Rose Is The Symbol Of Love? Read This Amazing Story)तर कधी गजरा. बाबांनी आईसाठी मोबाइल घेतला असेल आणि ड्रेसही. तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी गिफ्ट हॅम्पर्स, घड्याळ वगैरे घेत असाल. याचाच अर्थ भेटवस्तूंचे स्वरूप बदलत आले आहे. पण एक गिफ्ट असं आहे, जे प्रत्येकानेच आपल्या लव्हरला दिले असेल. ते म्हणजे गुलाबाचे फुल. गुलाब हे फक्त फुल म्हणून संबोधले जात नाही. तर ते अनेक वर्षांपासून जोडप्यांची भांडणं मिटवत आलं आहे. गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. आपण रोज डे साजरा करतो. (Rose Day 2025- Why Rose Is The Symbol Of Love? Read This Amazing Story)पण मग गुलाबच का? असा विचार केला आहे का? मुळात गुलाब देणं, रोज डे साजरा करणं भारतीय नाही, तर पाश्चात्य पद्धती आहेत. यामागे एक ग्रीक दंतकथा आहे. जी 'ब्लुमकॉलेज'च्या पेजने कव्हर केली आहे.
ग्रीक-रोमन दंतकथा
एक 'एफ्रोडाईट' नावाची ग्रीक देवी आहे. ती प्रेम, सौंदर्य आणि इच्छेची देवता मानली जाते. ग्रीक कथांनुसार, ती दिसायला फार सुंदर होती. एक दिवस ती अॅडोनिस नामक एका शिकार्याच्या प्रेमात पडली. तिने त्याला शिकार करण्यात खूप धोका आहे, तू हे काम सोडून दे असं सांगितलं. पण त्याने तिचं ऐकलं नाही. एकदा शिकारीला जात असताना अॅडोनिसवर एका रानडुक्कराने हल्ला केला. तो फार जखमी झाला. तो त्याचे शेवटचे श्वास घेत होता. त्याने एफ्रोडाईटच्या मीठीतच जीव सोडला. त्याची अवस्था बघितल्यावर तिला अश्रु अनावर झाले. तिचे अश्रु अॅडोनिसच्या जखमेवर पडले. आणि त्याच्या रक्तातून गुलाबाच्या फुलाची निर्मिती झाली. त्यामुळे गुलाब हे त्याच्या बलिदानाचे व तिच्या अश्रुंचे मिश्रण आहे. अशी ग्रीक मान्यता आहे.
व्हिक्टोरियन युगामध्ये जोडप्यांमध्ये फार संवाद होत नसे. औद्योगिकीरणामुळे सर्व पुरूष सतत कामावरच असायचे. महिलांना फार बोलायची परवानगी नसतानाचा हा काळ होता. मग गुलाबाचे फुल प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग बनला. संवाद कमी होत असल्याने भावना व्यक्त करणे कठीण होते. अशा वेळी जर समोरच्याने कधी गुलाब दिले तर, तो तुमच्यावर प्रेम करतो असं समजून जायचं. तसेच संभोग क्रियेसाठी महिलांची संमती घेण्यासाठीही गुलाब दिले जायचे. नंतर जेव्हा संवाद वाढला, तेव्हाही गुलाब देण्याची पद्धत चालूच राहिली. त्यामुळे पुढच्या काळात गुलाबाला पॅशन आणि इंटमसी सारख्या गोष्टींचे देखील प्रतिक मानले जाऊ लागले.