Lokmat Sakhi >Relationship > Samantha ruth prabhu : ‘किस करायचं तरी..’ समंथानं सांगितलं नागा चैतन्य आणि तिच्या नात्यातलं एक सिक्रेट

Samantha ruth prabhu : ‘किस करायचं तरी..’ समंथानं सांगितलं नागा चैतन्य आणि तिच्या नात्यातलं एक सिक्रेट

Samantha ruth prabhu revealed about naga chaitanyas first wife : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी या दोघांनी सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:01 PM2022-02-15T14:01:53+5:302022-02-15T15:42:49+5:30

Samantha ruth prabhu revealed about naga chaitanyas first wife : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी या दोघांनी सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली.

Samantha ruth prabhu : Samantha ruth prabhu revealed about estranged husband naga chaitanyas first wife heres what she had said | Samantha ruth prabhu : ‘किस करायचं तरी..’ समंथानं सांगितलं नागा चैतन्य आणि तिच्या नात्यातलं एक सिक्रेट

Samantha ruth prabhu : ‘किस करायचं तरी..’ समंथानं सांगितलं नागा चैतन्य आणि तिच्या नात्यातलं एक सिक्रेट

समंथा रुथ प्रभू (Samantha ruth prabhu) आणि नागा चैतन्य (Naga chaitanyas) हे दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीतील ‘आयटी’ जोडपे मानले जात होते. म्हणजे असे जोडपे जे एकमेकांच्या अत्यंत प्रेमात आहेत, एकमेकांशी सगळं शेअर करतात. अखंड रोमॅण्टिक भासतात. मात्र असे हे जोडपे  विभक्त होण्याच्या बातमीने लाखो लोकांना दु:ख झाले.  लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच या दोघांनी सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली. अजून ते का वेगळे झाले याची चर्चा होत असते.  तेव्हापासून चाहते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच उत्सुक आहेत. हे दोघंही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूप व्यग्र आहेत आणि विभक्त होण्याबद्दल फारच कमी बोलले आहेत.  त्यांचं नेमकं काय बिनसलं हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या मुलाखतीही व्हायरल होत असतात.
सध्या अशाच एका जुन्या मुलाखतीची चर्चा आहे. ज्यात समंथाला काही अत्यंत खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा अर्थातच नागा आणि समंथा प्रेमात होते.
लग्नापूर्वी काही काळ ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहत होते.

त्या दोघांचे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हाची ही गोष्ट. लक्ष्मी मंचूच्या 'फीटअप विथ द स्टार्स’ या लोकप्रिय शोमध्ये समंथा सहभागी झाली होती. लक्ष्मी त्या कार्यक्रमात काही खासगी गोष्टीही स्टार्सना विचारते. लक्ष्मीने तिला विचारलं होतं की, तुम्ही दोघे लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते,तर अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या सामान्य लोकांच्या बेडरुममध्ये नसतात, आणि तुमच्या होत्या तेव्हा..?

१० मिनिटात झोपण्याची ट्रिक! रात्री पडल्या पडल्या झोप येण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुचवला भन्नाट उपाय

समंथा म्हणाली, त्याकाळी नागाकडे एक उशी होती. अगदी जीव की प्राण उशी. ती उशी आमच्या बेडरुममध्ये असायचीच. मी त्याला चिडवायचे की ही उशीच तुझी पहिली बायको आहे. मी त्याला किस करायचं ठरवलं तरी त्याची ती फेवरिट पिलो यायचीच जवळ..
आणि मग लाजत समंथा म्हणाली, मी जरा जास्तच बोलून गेलेय.. आता जास्त नको बोलायला. एवढं बास..

असं रोमॅण्टिक, खट्टं मिठं नातं असलेलं हे जोडपं विभक्त झालं याचं चाहत्यांना दु:ख वाटतं.
पण नाती अशीच असतात, माणसं आयुष्यात ‘मूव्ह ऑन’ही होतात..
समंथा आणि नागा हे त्याचं एक उदाहरण आहे.

सध्या समंथा शेवटची अल्लू अर्जुन स्टारच्या पुष्पा: द राइज मध्ये एका धमाकेदार डान्स नंबरमध्ये दिसली होती. या गाण्याचे नाव होते ऊ अंतवा (Oo Aantava). ती पुढे नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत शकुंतलम आणि काथु वाकुला रेंडू काधलमध्ये दिसणार आहे. दरम्यान, करीना कपूर आणि आमिर खान यांच्यासह नागा चैतन्य लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Samantha ruth prabhu : Samantha ruth prabhu revealed about estranged husband naga chaitanyas first wife heres what she had said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.