'नवऱ्याला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जात असतो.....' हे वाक्य आपण अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये वारंवार ऐकलेलं असतं. आता चांगलेचुंगले पदार्थ खाऊ घातले की नवरा किंवा बॉयफ्रेंड खुश होतही असतील. पण एवढी मेहनत करण्यापेक्षा जर चार- पाच गोड वाक्य बोलली, तरी तेवढाच परिणाम दिसून येऊ शकतो बरं का. म्हणूनच तर कधी लुटूपुटूचं भांडण झालं असेल आणि नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला खुश करायचं असेल, तर ही काही वाक्य अगदी पाठ करून टाका आणि सोयीनुसार त्यांचा वापर करा.
ही वाक्ये कायम लक्षात ठेवा..१. माझा तुझ्यावर विश्वास आहेकधीकधी आपल्या नवऱ्यावर किंवा बॉयफ्रेंडवर आपण दाखवलेला अविश्वास आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे, हे एक वाक्य जरी तुम्ही प्रेमाने म्हंटलं तरी त्याचा समाेरच्या व्यक्तीवर खूप चांगला परिणाम होतो. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास आहे, हे वाक्य खूप प्रेरणादायी असतं. आपल्या बायकोने किंवा गर्लफ्रेंडने आपल्यावर दाखवलेला विश्वास पुरूषांना सुखावणारा असतो.
२. आज तु मित्रांसोबत एन्जॉय करलग्न झालंय किंवा रिलेशनमध्ये आहात, त्यामुळे नवऱ्याने किंवा बॉयफ्रेंडने सगळे सेलिब्रेशन तुमच्या सोबतच केले पाहिजे, अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. कारण प्रेम आणि मैत्री या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून आयुष्यात जेवढे प्रेम महत्त्वाचे आहे, तेवढीच मैत्रीदेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला कधीतरी आपल्या मित्रांसोबतही एन्जॉय करावे वाटत असते. जर तुम्ही हे वाक्य म्हणून त्यांना तशी मोकळीक दिली, तर जोडीदार प्रचंड खुश होईल. तो प्रत्यक्षात जाईल की नाही, हा भाग वेगळा. पण तुम्ही एवढे म्हणालात तरी ते त्याच्यासाठी खूप असते.
३. आज तू मस्त दिसतो आहेसस्वत:ची तारीफ ऐकुन जशा महिला सुखावत असतात, तसाच आनंद पुरूषांनाही होत असतो. त्यामुळे अगदी सहज बोलता- बोलता जरी तुम्ही नवऱ्याच्या किंवा बॉयफ्रेंडच्या दिसण्याचे कौतूक केले, त्याला हॅण्डसम म्हंटले तरी एवढ्यावरच तुमचा पुढचा एक आठवडा तरी उत्तम जाईल.
४. तु खूप वेगळा आहेस...आपण चारचौघांसारखे नाही, आपण खरोखरंच कुणीतरी स्पेशल आहोत, असे वाक्य जेव्हा आपण इतरांकडून ऐकतो तेव्हा नकळतच मन फुलपाखराप्रमाणे हलकं होऊन उडू लागतं. असंच काहीसं पुरूषांचं पण असतं. तु इतरांसारखा नाहीस, तु खूप वेगळा, स्पेशल आहेस हे वाक्य पुरूषांनाही त्यांच्या बायकोकडून किंवा गर्लफ्रेंडकडून ऐकायला भारी आवडत असतं.
५. तु जसा आहेस तसा मला आवडतोसआपल्याला सतत कुणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्याला ते आवडत नसते. असं कुणी करत असेल तर शेवटी एक वेळ अशी येते की 'आपण जसे आहोत, तसे आहोत...' असे आपण स्वत:ला आणि समोरच्याला देखील ठणकावून सांगत असतो. आपल्याला अशी व्यक्ती हवी असते, जी आपल्याला आपल्या गुणदोषांसह स्विकारेल. म्हणूनच तर तु जसा आहेस, तसा मला खूप आवडतोस, हे वाक्य आठवड्यातून एकदा तरी नवऱ्याला म्हणा. बघा तुमच्यात भांडण होणारंच नाही.