स्वत: पुढकार घेऊन सासुबाईंचं लग्न लावून देणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या सुनेची गोष्ट एका मराठी मालिकेच्या माध्यमातून आपण काही दिवसांपुर्वीच पाहिली होती. अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही काहीसं असंच घडलं आहे. मितालीच्या सासुबाई म्हणजेच अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांचा नुकताच दुसरा विवाह झाला असून मितालीने यानिमित्ताने तिच्या सासुबाईंना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आईचं, वडिलांचं, किंवा सासु- सासऱ्यांचं दुसरं लग्न होताना बघणं ही मुलांसाठी खरोखरच भावनिकदृष्ट्या अतिशय जड गोष्ट असू शकते. म्हणूनच तर आईचं मन ओळखून तिच्यामागे एवढं खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल, तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल सिद्धार्थ (Sidhdharth Chandekar) आणि मिताली या दोन्ही स्टार्सचं कौतूक होत आहे.
या पोस्टमध्ये मिताली म्हणतेय की तिच्या सासूबाईंनी एवढा मोठा निर्णय न डगमगता खंबीरपणे घेतला, तसेच तिचा नवरा सिद्धार्थ यानेही आईच्या लग्नाला खंबीर साथ दिली याचा, आणि विशेष म्हणजे ती अशा कुटूंबाची एक सदस्य आहे, याचा तिला खूप अभिमान आहे.
बटाटेवड्यांचं कव्हर कधी जाड- कधी मऊसर होतं? बघा डाळीचं पीठ भिजवण्याची सोपी युक्ती
एरवी सासू- सून हे नातं म्हणजे एकमेकींना कायम पाण्यात पाहणाऱ्या... असं म्हणून ओळखलं जातं. पण मिताली आणि तिच्या सासुबाई याला अपवाद ठरल्या आहेत. या पोस्टमध्येच मिताली त्यांना म्हणतेय की आजवर सासूबाईंनी सगळ्यांसाठी खूप केलं, पण आता त्यांनी त्यांच्यासाठी जगण्याची वेळ आली आहे. सासूचं मन ओळखून त्यांच्या हळूवार भावनांना समजून घेणारी मिताली खरोखरच सुनेच्या भुमिकेतून, लेकीच्या भुमिकेतून आणखी पुढे जाऊन सीमा ताईंची मैत्रीण झाली आहे, असं या पोस्टवरून वाटतं.