‘सीमेन टेररिझम’ (semen terrorism) याबद्दल माहिती आहे का? सीमेन टेररिझम म्हणजेच वीर्य दहशतवाद. सध्या दक्षिण कोरियात या वीर्य दहशतवादाला लैंगिक गुन्हा ठरवून तशी शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. राजकारणातील महिला आणि तेथील प्रसारमाध्यमांनी ही मागणी लावून धरली आहे.
दक्षिण कोरियातील लेनिअण्ट न्यायालयाने एका महिलेचं सामान आपलं वीर्य टाकून खराब केल्याप्रकरणी त्या पुरुषाला संपत्तीचं नुकसान या कलमाखाली शिक्षा केली. न्यायालयाच्या या निर्णयानं असंतोष निर्माण झाला. दक्षिण कोरियातील राजकारणातील महिला म्हणताय की, त्या पुरुषाचा गुन्हा हा खरंतर लैंगिक गुन्ह्याशी संबंधित होता. त्यामुळे त्याला लैंगिक गुन्हा या कलमाखालीच शिक्षा व्हायला हवी.
लेनिअण्ट न्यायालयाच्या कामकाजावर, लैंगिक गुन्ह्यांकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनावर दक्षिण कोरियात खूप टीका होवू लागली आहे. एखाद्या महिला/ मुलीवर किंवा त्यांच्या वस्तूवर स्वत:चं वीर्य टाकणार्या पुरुषांच्या या कृतीला ‘वीर्य दहशतवाद’ म्हणून संबोधलं जातं. दक्षिण कोरियात राजकारणातील महिलांप्रमाणेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्याला उचलून धरलं असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी योग्य ती कायदेशीर चौकट असावी, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ‘लैंगिक गुन्हा’ मानून गुन्हेगारांना तशी शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ते करत आहे.
छायाचित्र- गुगल
2019 मध्ये एका पुरुषानं एका महिलेच्या शुजवर आपलं वीर्य टाकून ते खराब केले. तेव्हा पोलिसांनी केलेल्या तपासानुसार त्याच्यावर मालमत्तेचं नुकसान केल्याचं कलम लावलं गेलं. कोर्टानं त्याला 500,000 वोन भारतीय चलनानुसार 31, 575 रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं होतं की त्या इसमानं प्रयक्ष शारीरिक स्पर्शान कोणतीही कृती केली नसल्या कारणानं या गुन्ह्याला लैंगिक गुन्हा म्हणावा अशी कायदेशीर व्यवस्थाच नाही.
त्याच वर्षी आणखी एका इसमाला दुखापत करण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या इसमानं त्याच्या प्रेमाला नकार देणार्या महिलेचा बदला घेण्यासाठी म्हणून तिच्या कॉफीत रेचक आणि कामोत्तेजक औषधं मिसळली. एवढंच नव्हे तर सहा महिन्यात त्या इसमानं त्या महिलेल्या बाबतीत 54 वेळा आपलं वीर्य आणि बेडका ( खाकरुन काढलेला कफ) तिच्या अनेक गोष्टीवर टाकला. पण अशा गुन्ह्याला कोर्टानं दुखापत करण्याचा प्रयत्न या कलमाखाली शिक्षा दिली. कारण कोर्टाच्या मते लैंगिक गुन्ह्यासारखं यात काहीच नव्हतं किंवा त्या महिलेवर प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार झालेलाही दिसत नव्हता.
छायाचित्र- गुगल
मे 2021 मधे नागरी सेवेत असलेल्या एका पुरुषाला तेथील न्यायालयाने भारतीय चलनानुसार 1,89 499 रुपयांचा दंड ठोठावला. या इसमाने एका महिलेच्या कॉफीच्या भांड्यात स्वत:चं वीर्य टाकलं. सहा महिन्यात त्याने ही कृती सहा वेळा केली. त्यामुळे त्याला कोर्टानं कॉफीच्या भांड्याचं नुकसान केल्याप्रकरणी मालमत्तेचं नुकसान या कलमाखाली दंड केला.
दक्षिण कोरियातील राजकारणात असलेल्या बेक यांनी नॅशनल असेम्ब्लीमधे मागील महिन्यात प्रत्यक्ष शारीरिक संपर्काशिवाय इतर घटक वापरुन किंवा त्याद्वारे महिलांची लैंगिक संभावना करण्याचा प्रयत्न करणार्या कृतींना लैंगिक गुन्हा समजला जावा. अशा गुन्ह्यांकडे बळी ठरलेल्या महिलांच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं, अशी मागणी करणारं एक विधेयक मांडलं. अशा पध्दतीचं एक विधेयक बेक यांच्या सहकारी पक्षातील ली सु-जिन यांनी गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधे मांडलं. त्यात महिलांप्रती असभ्य वर्तनाच्या व्याख्येचा परीघ वाढवण्याची मागणी केली आहे.
छायाचित्र- गुगल
दक्षिण कोरियात महिला आणि मुलींसोबत अशा वीर्य दहशतवादाच्या घटना सतत घडत आहेत. प्रत्यक्ष शारीरिक संपर्क न करता केली जाणारी ही कृती म्हणजे विनयभंगच आहे . पण तेथील कोर्टाने अशा 53 टक्के गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना केवळ निलंबनाची शिक्षा ठोठावली.
प्रत्येक लैंगिक गुन्हा हा गुन्हाच आहे. कोणाला वीर्य दहशतवाद म्हणजे महिलांच्या विषयी असलेल्या रागातून घडलेली केवळ एक कृती वाटेल. पण ही केवळ रस्त्यावर चालता चालता घडलेला प्रसंग अथवा कृती नसून विशिष्ट लिंगाला लक्ष करुन केलेली कृती आहे. तेव्हा अशा वीर्य दहशतवादाला लैंगिक गुन्हाच मानावं आणि लैंगिक गुन्हेगारांना जी शिक्षा ठोठावली जाते ती या गुन्हेगारांना करावी अशी मागणी दक्षिण कोरियात होत आहे.