लैंगिक संबंध (Sexual Health) हा रोमॅण्टिक नातेसंबंधांचा, विवाहाचाही अत्यंत नाजूक, महत्त्वाचा भाग आहे. बाकी गोष्टींसह लैंगिकदृष्ट्या परस्परांशी किती जुळतं यावर बरंच काही अवलंबून असतं. कारण लैंगिकदृष्ट्या असमाधानी असलेल्या दोन व्यक्ती एकत्र राहिल्या तरी त्या आनंदी नसतात. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणाच्या आकडेवारी यासंदर्भातही चर्चेत आहे. (National Family Health Survey) लग्न, सेक्स, लग्नाचं वय आणि पहिल्यांदा शरीर संबंध ठेवण्याचं वय यासंदर्भातही सर्वेक्षण करण्यात आलं, त्यातून अनेकांना धक्का बसेल अशी आकडेवारी समोर आली आहे. (Bedroom life of indians physical relationship before marriage in india national family health survey 5 data)
लग्नाआधी किती पुरूष, स्त्रिया शारीरिक संबंध ठेवतात याचाही आढावा घेण्यात आला. आकडेवारीनुसार पुरूष आणि महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचं प्रमाण वेगवेगळं दिसतं. लग्नाआधी सेक्स करण्याबाबत पुरूषांचं मत महिलांपेक्षा वेगळं आहे. सर्वेक्षणातील सरासरी ७.४ टक्के पुरूषांनी आणि १.५ टक्के महिलांनी लग्नाआधी संबंध ठेवल्याचं सांगितलं.
सर्वेक्षणातील जवळपास १२ टक्के शीख पुरूषांनी सांगितलं की, त्यांनी लग्नाआधी संबंध ठेवले होते. (Sex Before Marriage)
सगळ्या धार्मीक समुदायांमध्ये हा आकडा जास्त आहे. तर शीख महिलांमध्ये हा आकडा ०.५ टक्के होता. जो सगळ्यात कमी होता. हिंदू पुरूषांमध्ये हा आकडा ७.९ टक्के तर मुस्लिम पुरूषांमध्ये ५.४ टक्के, ख्रिश्चन पुरूषांमध्ये हे प्रमाण ५.९ टक्के आहे. हिंदू महिलांमध्ये लग्नाआधी संबंध ठेवण्याचे प्रमाण १.५ टक्के, मुस्लिम महिलांमध्ये १.४ टक्के आणि ख्रिश्चन महिलांमध्ये हे प्रमाण १.५ टक्के आहे.
सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?
आर्थिक स्थितीवरूनही गरीब आणि श्रीमंत पुरूष, महिलांमध्ये लग्नाआधी सेक्स करण्याचे प्रमाण पाहण्यात आले. लग्नाआधी शरीर सबंध ठेवण्याचं प्रमाण आणि मतं महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच होती. पण महिला या गोष्टी खुलेपणानं स्वीकारत नसल्याचं दिसून आलं. भारतात सहमतीनं शरीरसंबंध ठेवण्याचे वय १८ वर्ष आहे. पण यापेक्षा कमी वयाच्या ६ टक्के महिलांनी सर्व्हेक्षणात सांगितले की त्यांनी आधीच संबंध ठेवले होते.
भारतीय महिला होतात पुरुषांपेक्षा 'लवकर' सेक्शुअली ऍक्टिव्ह; Sex Life चं गुपीत सांगणारा रिसर्च समोर
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ४.३ टक्के मुलांनी लवकर संबंध ठेवल्याचं मान्य केलं. महिला लवकर सेक्शुअली एक्टिव्ह होण्यामागे अनेक गोष्टी आहेत. अनेक मुली कमी वयात लैगिंक शोषणाला बळी पडतात. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ३ टक्के महिलांचं म्हणणं होतं की २२ वर्षांचे होण्याआधीच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते.