'मला तिच्याबद्दल खूप आकर्षण वाटतं, सतत पॉर्न पाहण्याची इच्छा होते.......' वयात येणाऱ्या मुलांमध्ये लैगिंक भावना वाढत जाणं आणि त्यातून आकर्षण वाढून शरीरसंबंधाची इच्छा होणं हे सामान्य आहे. साधारणपणे पालकांची इच्छा अशी असते की मुलांनी लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदारासोबतच लैगिंक संबंध ठेवावेत. तोपर्यंत आपल्या भावनांना आवर घालावी. पण सध्याची परिस्थिती पाहता कॅज्यूअल सेक्स म्हणजचे बेजबाबदार संबंधांचं प्रमाण वाढताना दिसतं. अशा स्थितीत पालकांनी मुलांपर्यंत ‘responsible sex’ म्हणजेच जबाबदार सेक्सबाबत योग्य माहिती पोहोचवणं गरजेचं असतं. याबाबत लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांनी टाईम्स ऑफ इंडीयाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (What are the signs that your boyfriend is using you?)
डॉ. भोसले सांगतात की, ''जरी पालक आपल्या मुलांच्या लैंगिक भावना पुढे ढकलण्यासाठी किंवा आवरण घालण्यास प्रोत्साहित करत असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक तरुण लैंगिक संप्रेरकांची (sex hormone) तीव्रता वाढल्यावर लवकर लैंगिक सक्रिय होण्याच्या मोहाला बळी पडतात. हेच कारण आहे, जेव्हा मुलं लैंगिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. जोडीदारसह संभोगानंतरच्या भावनिक परिणामांबाबत माहिती असणं, (STD) लैगिंक संकमण संसर्ग, नको असलेली गर्भधारणा या गोष्टींची माहिती असल्यास तरूणावस्थेतील मुलांना चुकीचा निर्णय घेण्यापासून रोखता येऊ शकतं.''
शरीर संबंधानंतर लघवीला जाणं का गरजेचं? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं? जाणून घ्या
पुढे ते सांगतात की, ''सध्या सगळेचजण अशा गोष्टी करतात आणि गप्प बसतात. कित्येक किशोवयीन मुलं मुली ड्रग्स, दारू पिण्याचे प्रयोग करून पाहतात तसचं या सेक्शूअल रिलेशन्सकडेही पाहिलं जात आणि अशा गोष्टी गुप्तपणे केल्या जातात. यामुळे काय चूक, काय बरोबर हे कळण्यासाठी सेक्स एज्यूकेशन देणं गरजेचं आहे. अनेक मुली मित्रांच्या ‘पीअर प्रेशर’ला बळी पडतात. जसं की, नात्यात सेक्स नसेल तर ब्रेकअप करूया. अशाप्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग अनेकदा बॉयफ्रेंडकडून केलं जातं. अशा मित्रांना खरोखरंच तुमची काळजी वाटते का? हे तपासणं खूप महत्वाचे आहे. आजकाल प्रत्येकजण करतोय म्हणून तुम्हालाही मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत लागल्या तर हे बेजबाबदार लैंगिक वर्तन ठरू शकतं.''
सेक्ससाठी इमोशल ब्लॅकमेलिंग
इमोशल ब्लॅकमेलिंगबाबत डॉ. भोसले म्हणतात, ''जी व्यक्ती तुम्हाला सेक्ससाठी जबरदस्ती करत आहे ती खरोखर तुमच्या इच्छेचा आदर करत नाही. अशा नातेसंबंधात पुढे जाण्यापासून सावध असले पाहिजे. जिथे तुमचा जोडीदार त्याला हवं ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जिथे तुमचा आदर केला जात नाही अशा नात्यात राहायचे आहे की नाही? रिलेशनशिपमध्ये तुमचा गरजेनुसार वापर केला जात आहे का?, याचा विचार करणं गरजेचं आहे. अनेकदा किशोरवयीन मुले म्हणतात की, त्यांनी पहिल्यांदाच संभोग केला, कारण त्यांना 'जिज्ञासा' होती. कुटुंबात लैंगिकतेबद्दल खुले आणि स्पष्ट संभाषण किशोरवयीन मुलांना सेक्सबद्दल वाटणारी जिज्ञासा कमी करू शकते. परिणामी लैंगिकतेचा शोध घेताना तिला किंवा त्याला अधिक जबाबदारीने वागण्यास मदत होऊ शकते.''