लैंगिक सुख हे वैवाहिक जीवनात अत्यंत आवश्यक गोष्ट असते. आणि ते सुख पती-पत्नी दोघांना मिळाले तर ते नाते अधिक भक्कम, आनंददायी होत. नात्यातला रोमान्स आणि फॅण्टसीही टिकून राहते. मात्र नात्यात अनेकदा एकाला सुख वाटते तेच लैंगिक सुख दुसऱ्याला अपूर्ण वाटू शकते. किंवा सुखच लाभत नसते. कदाचित ते संबंध नकोसे, किळसवाटे आणि त्रासदायकही वाटू शकतात. (How to Tell Your Partner You Are Not Satisfied in Bed)
अनेक महिलांच्या वाट्याला ते सुख पुरेसं नसतं मात्र त्या बोलत नाहीत. आपल्या जोडीदाराला आवडणार नाही म्हणून गप्प राहतात, घुसमटतात. आणि त्यांच्या जोडिदारांनाही ते नीट कळत नाही. त्यामुळेही नात्यातला ताण वाढत जातो. आणि वैवाहिक सुखातला रस संपून जातो. (Signs That Your Partner Is Not Satisfied)
सेक्सनंतर जोडीदार समाधानी आहे की नाही?
१. मेन्स एक्सपीच्या रिपोर्टनुसार सेक्सनंतर अनेक महिलांना थकवा येतो. तो थकवा त्या जाणवू देत नाहीत मात्र थकवा आला असेल तर त्यासंदर्भात बोलायला हवं.
२. अत्यंतिक सुखाच्या क्षणी काहीजणी डोळे मिटून घेतात. मात्र संवाद असेल तरच कळू शकते की ते डोळे सुखाने मिटले आहे की आतल्या आत त्रास सहन केला जात आहे.
बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं
३. काही महिलांची सेक्सनंतर चिडचिड होते, रडू येतं त्यावेळी अनेकदा त्यांचे पूर्ण समाधान झालेले नसते. अशावेळी एकमेकांना समजून घेणं गरजेचं असंत.
४. जोडीदार वारंवार सेक्सला नकार देत असेल तर त्यातून त्याला सुख लाभत नाही असे समजावे, बोलून किंवा वैद्यकीय मदतीने हा प्रश्न सोडवायला हवा.
लग्न झालेल्या महिलांकडे तरुण जास्त आकर्षीत होतात हे खरं की खोटं? रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात..
५. अनेकदा शारीरिक व्याधी, कामाचे ताण यामुळेही सेक्समधला रस कमी होतो त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
६. पोर्न, सिनेमे किंवा अतीरंजित वर्णन हे सारे खरे न मानता हेल्दी लैंगिक संबंध असतील आणि त्यातून मानसिक शारीरिक समाधान लाभेल याचा विचार पती पत्नी दोघांनी करायला हवा.