Join us  

तासंतास पांचट गप्पा, चावट कमेण्ट्स, सेक्सी व्हिडिओ शेअरिंग; आपण जाळ्यात अडकलो आहोत हेच मान्य नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 3:09 PM

ऑनलाइन सेक्सी-फ्लर्टिंग सुरु असतं, सेक्स चॅट केले जातात, नग्न फोटो मागितले जातात आणि यासाऱ्यातून बाहेर पडायचा रस्ताच सापडत नाही, असं होतं तेव्हा..

ठळक मुद्देलैंगिक समाधान केवळ डिजिटल सेक्सपुरतंच मर्यादित राहील आणि...?

-निशांत महाजन

तुमचं असं कधी होतं का, तुमचा मूड खूप चांगला असतो, आणि अचानक तुम्ही व्हॉट्सॲप ग्रूपमधल्या चर्चा वाचता, आणि मूड जातो. उदास वाटायला लागतं.कधीकधी एकदम चिडचिड होते. रडावंसं वाटतं. फटीग येतो. डोकं जड वाटतं. -होतं असं?त्याउलट कधी अवचित कुणीतरी म्हणतं डीपी एकदम छान आहे. मग गप्पा सुरु होतात. फ्लर्ट करणं सुरु होतं. आपल्याला मस्त वाटतं. त्या गप्पा हळूहळू सवयीच्या होतात. मग इमेज शेअरिंग,नाजूक गोष्टी शेअरिंग सुरु होतं. तासंतास व्हिडिओ कॉल होतात. आणि एक दिवस हे सारं नाही झालं तर लगेच चिडचिड होते. लेफ्ट आऊट फिलिंग येतं. -होतं असं?कधीकधी आपण फेसबूकवर पोस्ट टाकतो. आणि येणाऱ्या कमेण्ट्स आणि लाइक्स मस्त एन्जॉय करतो. कधी मात्र आपल्याला लोक नावं ठेवतात. ट्रोल केलं जातं. टर उडवली जाते. अशावेळी कुठं तोंड लपवावं हे कळत नाही. आपल्या स्व प्रतिमेच्या ठिकऱ्या उडतात. -होतं असं?कितीही नाही म्हणा, ऑनलाइन असलेल्या आणि व्हॉट्सॲप-फेसबूक वापरणाऱ्या प्रत्येकाचं सध्या असं होतं. प्रमाण कमीजास्त असेल मात्र ऑनलाइन असताना मूड्सचा झोपाळा असा वरखाली होत राहतो. आपल्या लक्षातही येत नाही मात्र आपली चिडचिड, कामावरुन लक्ष उडणं, आपण अजिबात फोकस करु न शकणं, उदास वाटणं आणि अत्यंत एकाकी वाटणं हे सारं सतत ऑनलाइन राहिल्यानं वर्तन समस्या म्हणून आता समोर येत आहे.

(Image : Google)

तरुण मुलामुलींमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण जास्त

तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष आणि काळजीही अलिकडेच जर्नल ऑफ सायबर सायकॉलॉजी बिहेव्हिअर ॲण्ड सोशल नेटवर्किग या आरोग्य पत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.तरुण मुलामुलींमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण जास्त आहे, हे उघड आहे. मात्र सेक्स मेसेजेस एकमेकांना करता करता नग्न इमेजेसही काहीजण पाठवतात. त्यातून काही नकोसे मेसेज, नकोसे जोक्स, टिका, टोमणो हे सारं सुरु होतं. आणि अस्वस्थता वाढते आणि ताण वाढून अनेकांना औदासिन्य छळू लागतं. ते जर वेळीच आवरलं नाही तर डिप्रेशनच्या दिशेनंही वाटचाल सुरु होते असं हा अभ्यास सांगतो.आणि धोक्याचा इशाराही देतोय की, आपल्या डिजिटल फुटप्रिण्टकडे बारकाइनं पहा. आपण काय डिजिटली मागे ठेवतोय त्याचा विचार करा कारण त्या समुद्रातून ते कधीही बाहेर फेकलं जाणार नाही. आणि त्या डिजिटल फुटप्रिण्ट त्रासदायक आहेत का, हे तपासा.दुसरं म्हणजे वयात आल्यावर किंवा तारुण्यातही लैंगिक भावना प्रबळ असणं, सारं करुन पाहावंसं वाटणं, उत्सुकता चाळवणं हे अनैसर्गिक नाही. मात्र आपलं लैंगिक समाधान केवळ डिजिटल सेक्सपुरतंच मर्यादित राहील आणि प्रत्यक्षात आपण तणावग्रस्त, अस्वस्थ आणि डिप्रेशनमध्ये गेलेलो असू का, हे तपासून पहायला हवं असंही हा अभ्यास सांगतो.त्यामुळे आत्मपरिक्षण करत आपणही आपल्या फुटप्रिण्ट तपासलेल्या बऱ्याधोका आहेच, हे लक्षात ठेवणं उत्तम. त्यामुळे आपण डिजिटल सेक्सला तर बळी पडत नाही ना, याचा विचार करायला हवा.

टॅग्स :लैंगिक जीवनडिजिटल