Lokmat Sakhi >Relationship > Sexual Health : पॉर्न क्लिप पाहून जोडीदाराकडून ‘तसल्या’च अपेक्षा ठेवताय? ५ गोष्टी समजून घ्या...

Sexual Health : पॉर्न क्लिप पाहून जोडीदाराकडून ‘तसल्या’च अपेक्षा ठेवताय? ५ गोष्टी समजून घ्या...

Sexual Health : पॉर्न क्लिप्स पाहून स्वत:सह आणि जोडीदाराकडून अनेकजण ‘तसलं’काही करण्याच्या भलभलत्या अपेक्षा ठेवताय, समजून घ्या आभास आणि वास्तवातला महत्त्वाचा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 07:05 PM2021-12-22T19:05:28+5:302021-12-22T19:41:12+5:30

Sexual Health : पॉर्न क्लिप्स पाहून स्वत:सह आणि जोडीदाराकडून अनेकजण ‘तसलं’काही करण्याच्या भलभलत्या अपेक्षा ठेवताय, समजून घ्या आभास आणि वास्तवातला महत्त्वाचा फरक

Sexual Health : 6 difference between real sex and porn sex 5 Ways to Help Yourself to a Better Sex Life | Sexual Health : पॉर्न क्लिप पाहून जोडीदाराकडून ‘तसल्या’च अपेक्षा ठेवताय? ५ गोष्टी समजून घ्या...

Sexual Health : पॉर्न क्लिप पाहून जोडीदाराकडून ‘तसल्या’च अपेक्षा ठेवताय? ५ गोष्टी समजून घ्या...

सध्याच्या काळात घराघरातील पुरूषांमध्ये,तरुण आणि टीनएजर्समध्येही पॉर्न पाहण्याचा क्रेझ असतो. पॉर्न पाहण्याच्या सवयीचा परिणाम वैवाहिक आणि  लैगिंक जीवनावरही होतो. पॉर्नचं व्यसन लागल्यानंतर व्यक्ती एखाद्या कल्पनात्मक जगात जगत असते. पॉर्न क्लिप्समध्ये दाखवतात तेच शरीरसुख, सेक्स आहे असं समजून अनेक मुलं पार्टनरकडून तशा अपेक्षा ठेवायला लागतात. सेक्स एज्युकेशनच्या कमतरतेमुळे जोडप्यांमध्ये या गोेष्टींवरुन वाद व्हायला सुरुवात होते. बेडरूमध्ये घडणाऱ्या गोष्टी चारचौघात शेअर करता येत नसल्यानं महिलांची अधिकच कोंडी होते. या सगळ्यात लैगिंक सुख, समाधान, पार्टनरबाबतच्या प्रेमाची जाणीव या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यासाठी पॉर्न आणि रिअल लाईफ सेक्समधले फरक समजून घ्यायला हवेत. (5 Ways to Help Yourself to a Better Sex Life)
 

१) साइज?

सामान्यतः पुरुषांच्या लिंगाचा आकार पॉर्नमध्ये भासवल्या जात असलेल्या आकारापेक्षा लहान असतो आणि तो इरेक्ट असताना 5-6 इंच असतो. प्रत्येक पुरुषाचे लिंग नऊ इंच असतेच असं नाही. अशा परिस्थितीत पॉर्नमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये काल्पनिक जगासारखी असतात. ते वास्तव मानले तर शरीरसुख आणि समाधान लाभणार नाही.

२) स्त्रियांच्या अपेक्षांचे भ्रामक समज

वास्तविक जीवनात स्त्रिया लिंगाच्या आकाराची पर्वा करत नाहीत.  स्त्रियांची शरीरसुख, समाधान, त्यांना हवेसे वाटणारे सुख हे वेगळे असते. त्यासाठी जोडीदाराशी संवाद आणि प्रेम या दोन गोष्टी आवश्यक असतात.

 सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

३) पॉर्नस्टारप्रमाणे दिसण्याची मुर्ख अपेक्षा

आपली जोडीदार पॉर्न स्टारप्रमाणे वागावी, दिसावी असं वाटणं हा मुर्खपणा आहे.  बहुतेक पॉर्न स्टार त्यांच्या चांगल्या फिगरसाठी खूप मेहनत घेतात आणि सर्जरी करतात. कॅमेरा जे दाखवतो ते खरं नसतं. त्यामुळे अवास्तव अपेक्षांनी वैवाहिक नातं धोक्यात येऊ शकतं.

४) भावना महत्त्वाच्या

सेक्समध्ये खऱ्या उत्कटतेचा समावेश असतो आणि तो केवळ गरज भागवण्यापुरता नाही. यात दोन लोकांच्या भावनांचा, प्रेमाचा, परस्परांसह जगण्याचा, सहजीवनाचाही सुंदर सहभाग असतो. जे नातेसंबंधात महत्वाचे असते. केवळ शारीरिक कृती म्हणजे समागम नव्हे, त्यापलिकडे सहवास आणि सहजीवनही फार महत्त्वाचे असते.

५) पोझिशनचा आग्रह

चित्रपटाचे चित्रीकरण करताना कॅमेरा  अँगल विचारात घेऊन त्यानुसार दृश्याचे नियोजन केले जाते. हाच दृष्टिकोन पॉर्न फिल्म बनवतानाही घेतला जातो. प्रत्यक्ष आयुष्यात तशा पोझिशनचा आग्रह हा जीवावर बेतू शकतो.

खूप कमी लोकांना माहीत असतं हॅप्पी Sex लाईफचं 'हे' सिक्रेट; समोर आला रिसर्च

आयुष्य नासवू नका!

पॉर्नच्या बघण्याच्या सवयीबाबत लैंगिक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात , ''पॉर्नच्या माध्यमातून जे काही पाहिलं जातं ते कृत्रिम आणि अतिरंजित असतं. सिनेमात अनेकदा एक हिरो ८ ते १० अनेक गुंडाना मारताना दाखवला जातो. प्रत्यक्षात मात्र एक व्यक्ती एवढ्या लोकांचा एकट्यानं सामना करू शकत नाही. करमणुकीसाठी ही कलाकृती तयार केली जाते. त्याचप्रमाणे पॉर्नसुद्धा करमणुकीसाठी तयार करण्यात येतं, ते खोटं, आभासी आहेत. त्यात वास्तवदर्शी असे काहीच नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, स्वतःकडून किंवा जोडीदाराकडून त्याप्रकारच्या अपेक्षा करू नयेत.

मुख्य म्हणजे पॉर्न व्हिडीओमध्ये अनेकदा जे संबंध दाखवले जातात. ते प्रत्यक्षात घडत नसून तसं भासवलं जातं. हावभाव, हालचाली, प्रचंड प्रमाणात उत्तेजना कृत्रिम असतात. कारण त्यांना व्हिडीओ तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असतात. एकाचवेळी ३, ४ कॅमेरे लावले जातात. ते सारं खरंच असतं असं मानणं हेच किती चुकीचं आहे. उत्तम सहजीवनासाठी असे करू नये.''

Web Title: Sexual Health : 6 difference between real sex and porn sex 5 Ways to Help Yourself to a Better Sex Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.