तुमचे तुमच्या पार्टनरशी संबंध कसे यावर वैवाहिक जीवनातील आनंद अवलंबून असतो. बरेच लोक आपल्या शरीराबाबत कॉन्फिडेंट नसतात. याचा परिणाम लैगिंक जीवनावरही होत असतो. सध्याच्या जीवनशैलीत वजन वाढणं आणि मांड्या, पोट, छातीचा आकार बेढब होणं या समस्या अनेकांमध्ये दिसून येतात. ती किंवा तो फारसा आकर्षक दिसत नसल्यामुळे शरीरसंबंध ठेवण्यात रस वाटत नाही अशा जोडप्यांच्या तक्रारी तुम्ही ऐकून असाल. तुमचा विश्वास बसणार नाही पण लठ्ठपणामुळे लैगिंक जीवनावरही प्रतिकुल परिणाम दिसून येतो.
जास्त लठ्ठपणा पुरुष, स्त्रिया दोघांच्या लैंगिक संबंधात व्यत्यय आणू शकतो. अलीकडे, यावर बरेच संशोधन देखील केले गेले आहेत जे लठ्ठपणा एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर कसा परिणाम करू शकतो यावर प्रकाश टाकते. काही लोकांच्या जीवनात लठ्ठपणामुळे लैगिंग जीवनावर परिणाम होत नाही. पण जर परिणाम झाला तर तुम्ही डॉक्टरांशीही संपर्क साधू शकता.
फिटनेस फ्रिक आहे शिखर धवनची ४० वर्षीय पूर्व पत्नी; जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं सिक्रेट
अभ्यासातून असे दिसून येते की जे पुरुष किंवा ज्या स्त्रिया अधिक लठ्ठ असतात. त्याच्यात लैंगिक इच्छा कमी होत जाते. हे टेस्टोस्टेरॉनच्या कमी पातळीमुळे आहे, जे लैंगिक कार्यावर परिणाम करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असते, तेव्हा त्याच्या शरीरात ग्लोब्युलिन हार्मोनची पातळी वाढते. या संप्रेरकाचा सेक्स हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. यामुळे, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते आणि पुरुष आणि स्त्रियांमध्ये कामेच्छा कमी होऊ लागते.
लैगिंक जीवनाचा आनंद का घेता येत नाही?
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिनची बिघडलेली पातळी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. यामुळे योनीमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. यामुळे, सेक्स ड्राइव्ह दरम्यान आनंद कमी जाणवू लागतो आणि जोडीदाराशी संबंध ठेवणं कठीण होतं.
रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्
सेक्स ड्राइव्ह दरम्यान लोक सहसा वेगवेगळ्या पोझिशन्स वापरतात. जेणेकरून आनंद अनुभवता येईल. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असते तेव्हा असे करता येत नाही आणि दुखापतीचा धोका देखील वाढतो.आपल्या जोडीदाराशी जवळीक वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी चांगले नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी, योग्य लैंगिक जीवन असणे खूप महत्वाचे असते.