पत्नीच्या सेक्ससंदर्भात काय अपेक्षा असतात हे विवाहित पुरुषांनाही माहितीच नसतं. महिला बोलत नाही आणि लैंगिक सुखासह वैवाहिक आनंदापासूनही कायम दूरच राहतात. ते कसे टाळता येईल? (Sexual Health) वैवाहिक जीवनात समाधान मिळवण्यासाठी उत्तम लैगिंक जीवन असणं फार महत्वाचं असतं. दोघांसाठी. मात्र आपल्याकडे स्त्रियांच्या लैंगिक सुखाचा काही विचारच केला जात, स्त्रिया मोकळेपणानं अगदी जोडीदाराशीही बोलत नाही. अपेक्षा त्यांच्याही असतात, पण त्या सांगत नाही. जोडीदारानं समजून घ्यावं अशी अपेक्षा असते. (How To Make Sex Better For Her: 8 Tips To Pleasure A Woman)
जे अनेकदा शक्य नसतं किंवा घडत नाही. मग उगीच धुसफूस, भांडणं, सेक्समधला रसच संपणं आणि अन्य शारीरिक-मानसिक तक्रारी सुरु होतात. हे सारं टाळायचं तर पुरुषांनी, पतीनंही आपल्या पत्नीच्या-जोडीदाराच्या लैंगिक अपेक्षा, त्यांच्या सेक्सविषयीच्या कल्पना, फॅण्टसी समजून घ्यायला हव्यात. जर्नल ऑफ सेक्स ॲण्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासानुसार महिलांचं लैंगिक सुख, त्या सुखाच्या कल्पना आणि अपेक्षा या पुरुषांहून वेगळ्या असतात. अनेकजणी त्या कधीच बोलून दाखवत नाही त्यामुळे पुरेपूर सुखही त्यांच्या वाट्याला कधी येत नाही.
महिलांना नेमकं काय हवं असतं?
१) विचारा, तुला काय आवडतं? कशानं सुख वाटतं?
सेक्स म्हणजे केवळ विशिष्ट कृती नव्हे. लैंगिक सुखाविषयी बोलणं, रोमान्य हे सारं त्या क्रियेतला सुखद भाग आहे. त्यामुळे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते. त्यामुळेच सेक्स दरम्यान तुमच्या जोडीदाराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडत्या पोझिशनबद्दलही विचारा. कल्पनारम्य गोष्टींबद्दल बोला. सेक्स करताना तिला काय चांगले वाटते, काय हवे आहे हे विचारा, संवादातून सुखाकडे नक्की जाता येईल.
२) स्पर्श समजून घ्या
तुमच्या जोडीदाराचे शरीर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला कुठे स्पर्श करायला आवडते ते शोधा. स्त्रियांच्या स्तनाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळते, असे पुरुषांना अनेकदा वाटत असते, पण तसे अजिबात नाही. स्त्रियांच्या मनात काही वेगळे असू शकते. काहींना मानेवर तर काहींना पायावर चुंबन घेणे आवडते. तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा प्रयत्न करू शकता.
३) डर्टी टॉक करावं की नाही?
हा खरंतर अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणाला रोमॅण्टिक चावट बोललेलं आवडतं. त्यानं उत्तेजीतही होतात काहीजणी. काहींना अजिबात नाही आवडत, अश्लिल वाटतं. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला जे आवडत नाही ते बोलू नका, किंवा जे आवडतं तेच बोला.
४) वेगवेगळ्या पोझिशन्स
पोर्न साइट्स किंवा अन्य माहिती यातून सेक्स पोझिशनची जी माहिती मिळते तीच अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून ठेवू नका. कदाचित तिला ते सारे आवडतही नसेल. त्यामुळे दोघांना सुखकर अशी पोझिशन बोलून ठरवा, त्यात जबरदस्ती योग्य नव्हे.
५) ओरल सेक्स?
हा पुन्हा व्यक्तिगतच मुद्दा. काही महिलांना ते रुचते पण अनेकदा स्वच्छ अस्वच्छता, आरोग्य आणि मानसिक समज यामुळे अनेकींना ते आवडतही नाही. त्यामुळे ओरल सेक्सची सक्ती गरजेची नाही.
६) फोर प्लेकडे दुर्लक्ष करू नका
सेक्सचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच महिलांना फोरप्लेची गरज असते. तुमचा जोडीदार कशाचा आनंद घेत आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करा. बरं फोरप्ले जास्त वेळ करण्याची गरज नाही. यासाठी काही मिनिटेदेखील पुरेसे आहे. फोरप्ले योनीमध्ये नैसर्गिक ओलावा देण्यास मदत करते. यामुळे सेक्सचा आनंद दुप्पट होतो.
७) रोमॅण्टिक व्हा
बेडरुममधलं, वातावरण, फुलं, सिनेमा, दोघांनी एकत्र जेवणे, गप्पा हे सारं रोमॅण्टिक असणंही जोडीदाराला आवडत असेल तर ते करा.
८) घाई करणं चूक
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सेक्स केल्यानंतर उठण्याची घाई करू नका. महिलांना अनेकदा सेक्स केल्यानंतर जोडीदाराला बिलगून झोपावेसे वाटते. कदाचित तुमच्या जोडीदाराचीही तीच इच्छा असेल. ते समजून घ्या, अनेक पुरुष लगेच घोरायला लागतात ते चूक आहे.