Join us  

Sexual health : मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा का? कंडोम योनीमार्गात अडकला तर काय? -असे प्रश्न जोडपी विचारतात तेव्हा..

By manali.bagul | Published: February 24, 2022 10:28 PM

Sexual health : संभोग करताना कंडोम व्हजायनात अडकण्याची भीती वाटते? पिरिएड्समध्ये संबंध ठेवले तर काय होतं?, तज्ज्ञ सांगतात की....

वैवाहिक जीवन सुखी, आनंदी असण्यासाठी लैगिंग जीवन समाधानी आणि निरोगी असणं गरजेचं असतं. तर निरोगी लैंगिक जीवनासाठी सेक्सविषयी जोडीदारांत खुलेपणानं चर्चा होणं महत्वाचं आहे. जेव्हा दाम्पत्य एकमेकांच्या आवडी-निवडी, इच्छा, समजून घेत नाहीत त्यावेळी नात्यातला तणाव वाढत जातो. (Sexual Health Tips)आपल्याला नेमकं काय हवंय किंवा शरीर संबंध ठेवताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. मासिक पाळीत शरीर संबंध ठेवावेत का असा काहींचा प्रश्न असतो. अनेकदा स्त्रिया त्याकाळात होणाऱ्या त्रासाने वैतागलेल्या असतात. अनेकींना वेदना होतात. आणि जोडीदार संबंधांसाठी आग्रही असतात.

चुकीच्या गोष्टींमुळे गैरसमज जास्त असतात. तोच मुद्दा, कंडोम वापरण्यासंदर्भात. कंडोम वापरण्याविषयीही प्रचंड गैरसमज असतात. स्त्री-पुरुष दोघांचेही. कंडोममुळे पुरेसे समाधान मिळत नाही असे पुरुषांना वाटते, तर आपण सेफ सेक्स करतो असाही समज असतो तर महिलांना भीती असते ती कंडोम आपल्या नाजूक भागात, योनीमार्गातच अडकला तर काय होईल? हे प्रश्न खरे की खोटे की नुसते भ्रम आणि गैरसमज हेच अनेकांना माहिती नसतं असं लैगिंक विकारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात.

नेमकं खरं काय?

लैगिंक विकारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात, लैंगिक संबंध ठेवताना उत्तम गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर केला जातो. कंडोम वापरलं म्हणजे आपण सेफ सेक्स करत आहोत असा अनेकांचा समज असतो. इंटरकोर्सदरम्यान कंडोम महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये अडकण्याची भीती काहींच्या मनात असते. कुठेतरी असं घडल्याचं वाचलेलं किंवा ऐकलेलं असल्याने आपल्याही बाबतीत असं होईल का, याची भीती सतावते. कंडोम योनीत अडकल्यानंतर पोटात जाईल, गायब होईल, ऑपरेशन करूनच बाहेर काढावे लागेल. असे गैरसमज लोकांच्या मनात असतात. खरं तर असं काहीच होत नाही. (How to Remove a Stuck Condom from Your Vagina)

कोण म्हणतं भात खाल्ल्यानं वजन वाढतं? रोजच्या जेवणात भात खाण्याचे ५ फायदे; नेहमी राहाल मेंटेन

लग्न झाल्यानंतर सुरूवातीच्या दिवसात गर्भधारणा लगेच नको म्हणून बहुतांश जोडपी कॉन्ट्रासेप्टिव्हच्या स्वरूपात कंडोमचा वापर करतात. कारण ते सुरक्षित आणि सहज उपलब्ध होणारे आहे. विशेष म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. मात्र तरीही त्यांना काही शंका असतात.

विशेषत: महिलांनी लक्षात एवढंच ठेवायचं, कंडोम महिलांच्या योनीत अडकण्याचे प्रकार खूप कमी वेळा घडल्याचं दिसून येतं. जर असं झालंच म्हणजे योनीत कंडोम अडकलाच तर यात घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्ही स्वच्छ बोटांचा वापर करून सहजतेनं अडकलेलं कंडोम बाहेर काढून शकता. टॉयलेट सीटमध्ये बसल्यानंतरही अडकलेलं कंडोम काही प्रमाणात बाहेर येऊ शकतं. जे तुम्ही हातानं खेचून सहज बाहेर काढू शकता. सर्वच जोडपी खासकरून महिलांना याबाबत माहिती असणं गरजेचं आहे.

 

मासिक पाळी सुरू असताना संभोग करणं कितपत योग्य? (Is It Safe to Have Sex During Your Period?)

डॉ. भोसले सांगतात, ''मासिक पाळीत संबंध करण्याला मेडिकल सायन्स मनाई करत नाही. म्हणजे मासिक पाळीत संबंध ठेवायला काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे पुरूषांना किंवा महिलांना काही अपाय होत नाही, गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. त्या कालावधीत स्त्रीयांना त्रास होईल, ब्लिडींग वाढेल असेही त्रास उद्भवत नाहीत. म्हणजेच शारीरिकदृष्या त्रास वाढेल असं काहीच घडत नाही. त्यामुळे ज्यांना मासिक पाळीत संबंध ठेवायचे आहेत ते सेक्स करु शकतात.मात्र यासंदर्भात प्रश्न एवढाच की, महिलांची तयारी आणि इच्छा आहे. ती हो म्हणते का?

पोट, मांड्यांवरची वाढलेली चरबी पटकन होईल कमी; मेंटेन फिगरसाठी रात्रीच्या जेवणाआधी हे एक काम  करा

महिलेच्या शरीरातून रक्त वाहत असताना संबंध ठेवणं फारसं योग्य नाही. यामुळे बेडवर डाग पडू शकतात. इंद्रियांना रक्ताचे डाग लागतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीनं काही नुकसान होत नाहीये याचा अर्थ ती गोष्ट मुद्दाम करायलाच हवी, असं नाही. ते टाळणंच उत्तम. टाळावं. मासिक पाळीत संबंध ठेवणं वाईट असतं वगैरे... असे गैरसमज महिलांच्या मनात असतात. याशिवाय एखाद्या पुरूषालाही संबंधादरम्यान रक्त पाहून किळस वाटू शकते आणि मनावरही परिणाम होऊ शकतो.

स्वच्छतेच्या दृष्टीनेही मासिक पाळीच्या चार दिवसात संबंध न ठेवल्यास फायदेशीर ठरतं. याशिवाय रक्त हे कोणत्याही जंतूंचा प्रादुर्भाव होण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. जर पतीला काहीतरी इन्फेक्शन असेल आणि त्याबद्दल त्याला कल्पना नसेल तर (Silent Carrier) रक्ताचं माध्यम मिळाल्यामुळे पत्नीला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून या चार दिवसात दोघांनीही आराम घेऊन महिन्याच्या इतर दिवसात संबंधांचा आनंद घेतल्यास मानसिक, शारीरिकदृष्ट्या उत्तम ठरतं.

 

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप