Lokmat Sakhi >Relationship > Sexual Health : सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

Sexual Health : सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

Sexual Health : लाइफस्टाइल आणि लैंगिक आरोग्य आणि सुखाचा थेट संबंध असल्याचं अभ्यास सांगतात, क्षुल्लक चुका अनेक गोष्टी बिघडवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:18 PM2022-05-10T17:18:46+5:302022-05-10T17:34:12+5:30

Sexual Health : लाइफस्टाइल आणि लैंगिक आरोग्य आणि सुखाचा थेट संबंध असल्याचं अभ्यास सांगतात, क्षुल्लक चुका अनेक गोष्टी बिघडवतात.

Sexual Health : Sexual performance these habits can badly affect your sex life | Sexual Health : सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

Sexual Health : सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

स्त्री-पुरुषांच्या नात्यात प्रेम, विश्वास यांसह शारीरिक इंटिमसी असणंही तितकंच महत्वाचं असतं. इंटिमसीमुळे नातं मजबूत होण्यास मदत होते. अनेकदा सेक्स लाइफमध्ये असलेल्या समस्यांमुळे नात्यावर परिणाम होतो, ताण वाढतो. भांडणं होतात. जोडीदाराच्या मनस्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होतो. (Habits That Can Hurt Your Sex Life ) लैंगिक इच्छा कमी होतात किंवा त्यात सुख वाटत नाही. (Sexual Health) कौटुंबिक स्वास्थ्यच नाही तर मानसिक-शारीरिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. प्रत्येकवेळेस दोष जोडीदारात किंवा मानसिकतेत असतो असं नाही तर नकळत काही चुकीच्या सवयीही त्याला कारणीभूत ठरतात. (Sexual performance these habits can badly affect your sex life)

एका जर्मन अभ्यासानुसार लाइफस्टाइल चुका, त्यातून वाढलेलं वजन, आणि कमी होणारं लैंगिक सुख यांचा थेट संबंध दिसतो. गार्डिअन वृत्तपत्राने प्रसिध्द केलेल्या एका वृत्तानुसार, रिप्रॉडक्टिव्ह बायॉलॉजी ॲण्ड इंडिक्रोनोलॉजी २०२० या अभ्यासानुसार चुकीच्या लाइफस्टाइलचा, खाण्यापिण्याचा आणि वंध्यत्व समस्यांसह लैंगिक सुखाच्या अनेक प्रश्नांचा, नातेसंबंधातील कलहांचा थेट संबंध दिसतो. त्यामुळे जीवनशैली सुधार हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्या नात्यासाठी करायला हवा. (What can affect sex performance?)

1) आहार व्यवस्थित नसणं

जर तुम्हाला जंक फूड जास्त आवडत असेल तर तुमच्या शरीरात कार्ब्ज,  सॅच्यूरेटेड आणि ट्रांस फॅट भरपूर असेल. यामुळे ब्लड फ्लो खूपच कमी होतो. इंटेमसीदरम्यान एकुण ताकदीवरही त्याचावाईट परिणाम होतो. एनर्जी कमी पडते. भाज्या, प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश आहारात केल्यानं एनर्जी मेंटेन राहण्यास मदत होते. यामुळे सेक्शुअल ॲक्टही समाधानकारक होते.

2) जास्त मीठ खाणं

रोज जास्त मीठ खाणं ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण ठरू शकतं. प्रीपॅक्ड पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणं टाळा. त्यानं तब्येतीवर आणि एकुण कामवासनेवरही परिणाम होण्याची शक्यता असते?

3) नेहमी ताण-तणावात राहणं

जर कोणत्याही कारणामुळे नेहमी टेंशन असेल तर त्याचा  तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे इंटीमेट होण्याची इच्छा कमी होते. सेक्स लाईफ चांगली बनवण्यासाठी ताण तणावपासून लांब राहा आणि समस्येचं कारण शोधा. स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

4) एकमेकांशी मोकळेपणानं न बोलणं

जर सेक्स लाईफशी निगडीत कोणतीही गोष्ट सतावत असेल तर पार्टनरशी याची मोकळेपणानं चर्चा व्हायला हवी. जर एकमेंकाशी सेक्शुअल अपेक्षांबद्दल बोलण्यास खूप विचार करत असाल तर तुम्ही वैवाहिक आयुष्यातही सुखी राहू शकत नाही. म्हणून मनात जे काही आहे ते मोकळेपणानं बोला.

5) वजन वाढणं

सेक्स लाईफ चांगलं बनवण्यासाठी वाढलेलं वजन कमी करायला हवं. वाढलेल्या वजनामुळे सेक्स परफॉर्मंन्सवर वाईट परिणाम होतो. खासकरून पुरूषांमध्ये ही समस्या सर्वाधिक जाणवते. एका अभ्यासात समोर आलेल्या अभ्यासानुसार ज्या पुरूषांची कंबर ४० इंचापेक्षा असते त्यांना नपुसंकतेच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
 

Web Title: Sexual Health : Sexual performance these habits can badly affect your sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.