रिलेशनशीपमध्ये भावभावनांसोबतच फिजिकल रिलेशन्स चांगले असणं खूप गरजेचं असतं. रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपलं नातं अधिक चांगलं कसं होईल याचा विचार करत असतो. या सगळ्यात व्यक्तीच्या सेक्स लाईफची महत्वाची भूमिका असते. अनेकदा काही गैरसमजांमुळे जोडप्यांना आपल्या सेक्स लाईफचा हवा तसा आनंद घेता येत नाही. नेहमी निराश वाटतं म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेक्स लाईफ चांगली राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
१) तुमचा विश्वास बसणार नाही पण अनेक जोडप्यांना सेक्सबाबत उत्कट भावना येत नाही. परमोच्च आनंद मिळेपर्यंत जोडप्यांमध्ये शरीर संबंध होत नाही, अशीही अनेकांची तक्रार असते. इंग्रजीत यालाच क्लाइमेक्स असं म्हणतात. अनेकदा अशी स्थिती कपल्समध्ये उद्भवते. म्हणून जास्त चिंतेत राहण्याचं काहीही कारण नाही. अनेकदा महिला एकापेक्षा जास्तवेळा ऑर्गज़्मचा अनुभव घेतात.
२) खूपदा सेक्स संबंधित पुस्तक, पॉर्न व्हिडीओजमध्ये जाहिराती दाखवल्या जातात. ज्यात पुरूषांच्या प्रायव्हेट पाईट्सच्या कमी लांबीची समस्या दाखवली जाते. या प्रकारच्या जाहिराती तरूणांना भ्रमात टाकू शकतात. त्यामुळे गरज आणि माहिती नसताना पुरूष कोणताही उपाय करायला जातात. यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनेकदा पुरूषांच्या प्राव्हेट पार्टचा आकार लहान असतानाही ते पार्टनरला ऑर्गज्म देण्यात यशस्वी राहतात.
३) शरीर संबंधादरम्यान कल्पना केल्यानं तुमचा पार्टनरसोबतचा वेळ आणखी चांगला जाऊ शकतो. डोक्यात सुरू असलेल्या इंटिमेट कल्पनांमुळे आनंद वाढवता येऊ शकतो. पार्टनरसोबत असा वेळ घालवत असताना स्वतःला शांत ठेवा आणि या क्षणांचा आनंद घ्या.
४) काळानुसार नातं अधिक घट्ट होत जातं तर कधी कधी दुरावाही येतो. आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही. रिलेशन नेहमी चांगले राहण्यासाठी शेअरिंग फार महत्वाचं आहे. तुम्ही पार्टनरशी आपल्या बेडवरील आवडी निवडींबाबत चर्चा करा, तिला किंवा त्याला काय हवंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना स्पेशल फिल करून द्या.
५) साधारणत: नात्यात बराच वेळ घालवूनही स्त्रिया लैंगिक संबंधासाठी पुढाकार घेत नाहीत. याऊलट एका रिसर्चनुसार महिलांनी शरीर संबंधांसाठी पुढाकार घ्यावा अशी पुरूषांची इच्छा असते. त्यातल्या त्यात मुलं झाली असतील तर इंटिमेट होण्यासाठी वेळ काढणं खूप कठीण होतं. अशावेळी त्या रिलॅक्स होऊन स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत दोघांनीही वेळ मिळेल तेव्हा आपल्या रोमॅन्टिक लाईफवर लक्ष द्यायला हवं.
असा प्रयत्न करून पाहा
शेड्यूल करा तयार- जर तुम्ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्हाला शेड्यूल सेक्सची टर्म नक्कीच माहीत असायला हवी. यात दोघांनी मिळून शारीरिक संबंधासाठी एक अशी वेळ ठरवावी लागते जेव्हा दोघेही पूर्णपणे मोकळे असाल. म्हणजे काय तर सगळंकाही ठरवून केलं जातं.
कॅलेंडरवर मार्क करा- जर तुम्ही दोघेही शारीरिक संबंधासाठी दिवस आणि वेळ ठरवत असाल तर ती लेखी ठेवा. हवं तर दिवस आणि वेळ कॅलेंडरवर लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील. इतकंच काय तर मोबाइलमध्ये अलार्मही लावू शकता.
तयारीसाठी वेळ मिळेल- जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग करता तेव्हा त्या क्षणांसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात नवा रोमांच हवा असेल तर शेड्यूल सेक्स चांगला पर्याय ठरू शकतो. याने शारीरिक संबंधाची उत्सुकताही कायम राहील.
एकत्र चांगला वेळ घालवा- टेक्नॉलॉजीच्या या जगात सगळंच व्हर्चुअल झालं आहे. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही लोकांकडे वेळ नाही. अशात जर तुम्ही आधीच शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग कराल तर दिवसातला एक ठराविक वेळ तुम्ही सोबत असाल. बिझी लाइफमधून सोबत घालवलेला हा वेळ तुमचं नातं अधिक मजबूत करेल.