वैवाहिक जीवन चांगलं असण्यासाठी लैगिंक आरोग्य आणि लैगिक जीवन आनंददायी, सुरक्षित असणं गरजेचं असतं. मात्र लैगिंक समस्यांबाबत अजून पती-पत्नी एकमेकांशी खुलेपणानं बोलत नाहीत. (know why you and your partner sweat during sex) योग्य माहितीचा अभाव, वॉट्सपीय सल्ले, चुकीचे व्हिडिओज पाहणं यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता असते. (Sexual Health Tips)
जर तुम्ही कठोर व्यायाम म्हणजेच मसल्स रेसिस्टंस व्यायाम करत असाल तर अशावेळी खूपच घाम येतो. अशावेळी कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सेक्स करताना ऑर्गेज्मसाठी प्रयत्न केले जाता. अशावेळी दोन्ही पार्टनर्सच्या शरीरातून घाम निघतो आणि लोक घामानं पूर्ण भिजतात. सेक्शुअल लाईफवर याचा काय परीणाम होतो याबाबत माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे. (Sweating during sex)
सेक्स करताना घाम का येतो?
शारीरिक हालचालींमुळे घाम येणं हे खूपच सामान्य आहे. जर्नल ऑफ फिजिओलॉजीनुसार कोणत्याही शारीरिक एक्टिव्हीजप्रमाणे व्यायाम आणि शारीरसंबंध ठेवताना घाम येतो, यावेळी हृदयाचे ठोके जलद गतीनं होतात. म्हणूनच सेक्स करताना शरीरातलं पाणी घामाद्वारे बाहेर पडतं. वैवाहिक जीवनात जर एखाद्या दिवशी तुम्हाला जीमला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही संबंधाद्वारे कॅलरीज बर्न करू शकता.
पोट कमीच होत नाहीये? शरीरातलं एक्स्ट्रा फॅट्स घटवण्याच्या ५ टिप्स- सुडौल, कॉन्फिडंट दिसाल
जर्नल ऑफ फिजियोलॉजिकल एन्थ्रोपोलॉजी मधील संशोधन निष्कर्ष दर्शवतात की सेक्स दरम्यान पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये AC (Adrenocorticotropic hormone) प्रेरित स्टिरॉइड वाढते. स्टिमिंगमुळे संबंधांना उर्जा मिळते. परंतु स्टिमिंगचे प्रमाण आणि त्याचा लैंगिकतेवर होणारा परिणाम स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो.
घामाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या फेरोमोन हार्मोनचा नैसर्गिक वास जोडीदाराला उत्तेजित करण्यास मदत करतो. फेरोमोन हार्मोन्स नैसर्गिक कामोत्तेजक आहेत. घाम येणे हे कॉर्टिसोलची पातळी वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते, जे आरोग्यासाठी चांगले आहे. स्टीमिंग हे खरं तर सेक्सचा आनंद दर्शविणारा एक संकेत आहे.
ओसाका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि कोबे युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, शरीरसंबंधादरम्यान स्त्री आणि पुरूष या दोघांनाही जवळपास समान प्रमाणात घाम येतो. एकदा हार्मोन्स रिलिजची सुरुवात झाली की महिलांपेक्षा पुरुषांना जास्त घाम येऊ लागतो. शास्त्रज्ञांनी यामागे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन असल्याचं सांगितलं आहे.
आफ्रिकन जर्नल ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या मते, सेक्सनंतर पुरुष सेक्स हार्मोन्स अनेकदा वाढतात. पण जास्त घाम येणे देखील संसर्गास आमंत्रण देऊ शकते. अति घामामुळे मांड्यांवर फंगल इन्फेक्शन येऊन स्पर्शानं ते शरीराच्या इतर भागांवरही परसू शकतं. काही इन्फेक्शन्स सेक्शुअली ट्रांसमिडेट आजारांचेही कारण ठरू शकतात.