पती, पत्नी असो किंवा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड प्रत्येक नात्यात एक हेल्दी बॉन्डींग असणं गरजेचं आहे. यामुळे नातं वर्षानुवर्ष टिकून राहत असतं. रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनरसह इंटिमेट होणं नात्याचा एक महत्वाचा भाग आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का चांगल्या संबंधांव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं लैगिंक जीवन आणि आरोग्यही चांगलं राहिल. शरीर संबधानंतर करायच्या काही गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल आणि संक्रमणापासून बचाव होऊ शकेल.
साबणाच्या पाण्यानं गुप्तांग स्वच्छ करणं
अनेक महिला संबंधानंतर अंघोळ करणं पसंत करतात. यावेळी वजायनल एरियात साबणाचा अतिवापर केल्यास पीएच संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट्सचे नैसर्गिक मॉईश्चर कमी होऊ शकतो. वारंवार हेच घडत गेल्यास इन्फेक्शन पसरू शकतं.
अंडर गार्मेंट्स तेच वापरणं
आपण लैंगिक संबंधानंतर चांगली झोप घेण्याचा विचार करत असाल तर तेच वापरलेले, खराब अंतर्वस्त्राच्या वस्त्र परिधान करुन झोपू नका. रात्री कपड्यांशिवाय झोपेण्याचे बरेच फायदे देखील आहेत. पण बर्याच वेळा खाजगी भाग ओला झाल्याने शरीरावरील कपड्यावर प्रतिक्रिया येते जे संसर्गाचे कारण बनते. जर तुम्ही अंघोळ करत असाल तर इनरवेअरर्ससुद्धा बदलून घ्यायला हवेत.
ओल्या वाईप्सचा वापर करू नये
लैंगिक संबंधानंतर तुम्हाला सुस्तपणा वाटू शकतो आणि अंथरुणावरुन उठावसं वाटतच नाही. अशा परिस्थितीत महिला ओल्या वाईप्सनं पुसून त्यांचे खाजगी भाग स्वच्छ करतात. आपणास हे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण या ओल्या वाइपमध्ये रसायने असतात आणि आपल्या खाजगी भागासारख्या संवेदनशील ठिकाणी वापरणं सुरक्षित समजलं जात नाही.
जास्त गरम पाण्यानं अंघोळ करणं
शारीरिक संबंधानंतर आंघोळ करणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु जास्त गरम पाणी वापरणे टाळा. यामुळे योनीवर परिणाम होऊन संक्रमणाचा धोका वाढू शकतो. तुम्ही कोमट पाण्याचा वापर करायला हवा.
लघवी रोखून धरणं
संभोगानंतर लघवी थांबवण्याची चूक करू नका. विशेषत: संबंधानंतर लघवीसाठी जावे, चांगले ठरते कारण बॅक्टेरिया आणि जंतू मूत्रमार्गे बाहेर येतात आणि यूटीआयचा धोका नसतो. शारीरिक संबंधानंतर युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं नाही, तर ज्यांना आधीपासूनच इन्फेक्शन असतं त्याचं इन्फेक्शन वाढू शकतं. पार्टनरला जर इन्फेक्शन असेल तर एकमेकांना होण्याची शक्यता असते.
व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. यावर उपाय म्हणून कधीही त्वचा डिहाड्रेट होऊ देऊ नका. इन्फेक्शन जर सुरूवातीच्या स्टेजला असेल तर पाण्याच्या वापरानं तीव्रता कमी होऊ शकते. संबंधानंतर लगेचच लघवीला जायलाच हवं असं काही नाही.