Lokmat Sakhi >Relationship > Sexual Health : महिलांच्या शरीरसुखासाठी फोरप्ले आवश्यक असतो, ते का? फोरप्ले म्हणजे काय?

Sexual Health : महिलांच्या शरीरसुखासाठी फोरप्ले आवश्यक असतो, ते का? फोरप्ले म्हणजे काय?

Sexual Health : फोरप्ले म्हणजे काय? त्याची गरज का असते? जाणून घ्या हॅप्पी सेक्स लाईफसाठी 'हे' सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 07:28 PM2021-12-20T19:28:04+5:302021-12-20T19:46:41+5:30

Sexual Health : फोरप्ले म्हणजे काय? त्याची गरज का असते? जाणून घ्या हॅप्पी सेक्स लाईफसाठी 'हे' सिक्रेट

Sexual Health : Ways to Spice Up Your Sex Life With Foreplay what is foreplay need | Sexual Health : महिलांच्या शरीरसुखासाठी फोरप्ले आवश्यक असतो, ते का? फोरप्ले म्हणजे काय?

Sexual Health : महिलांच्या शरीरसुखासाठी फोरप्ले आवश्यक असतो, ते का? फोरप्ले म्हणजे काय?

सेक्शुअल लाईफबाबत फोरप्ले, आफ्टरप्ले, ऑर्गजम असे अनेक शब्द ऐकण्यात येत असतात. अनेक अभ्यास सांगतात की, महिलांच्या लैंगिक सुखाशी फोरप्लेचा संबंध आहे. शरीरसुखासंदर्भात आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याने या शब्दांविषयी, त्याचे अर्थ आणि कृतीसंदर्भातले समज-गैरसमज याविषयी शास्त्रीय माहितीचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. चुकीची पुस्तकं, पिवळी पुस्तकं आणि आता पोर्न क्लिप्स पाहून त्यासंदर्भात गैरसमजही निर्माण होतात. अनेक महिलांना यासंदर्भात आपल्या अपेक्षा मोकळेपणानं सांगता येत नाहीत. (What is foreplay)

आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे हेच अनेकींना माहिती नसतं किंवा त्याबाबात बोलण्याचा संकोच असतो. आणि त्यातून मग असमाधान, नात्यातले ताण आणि अनेकदा आजार असेही चक्र सुरु होते. लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ.पारस शाह यांनी न्यूज18  वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, सुखी लैगिंक जीवनासाठी फोर प्ले का आवश्यक असतो? चावट चर्चेपलिकडे त्याची शरीरसुखात काय भूमिका असते?

फोरप्ले म्हणजे काय?

शरीरसंबंध किंवा तत्पूर्वीची शारीर जवळीक यासाठी दोन्ही जोडीदारांची संमती आहे का हे सर्वात महत्त्वाचे. एकाची इच्छा दुसऱ्याची बळजबरी असं होता कामा नये. दोघांनाही तेव्हढीच ओढ वाटते का याचा विचार करायला हवा. सेक्ससोबतच लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास पूरक ठरतात. फोरप्ले ही शरीर संबंधांची सुरुवात असते. जसं की कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप करणे खूप महत्त्वाचे असते. तसे सेक्स अर्थात कामक्रीडा यासंदर्भातही फोरप्ले हा त्याआधी वॉर्मअप आहे.

लैंगिक कृतीबाबतची आपल्या समाजात अनेकांची समज खूपच यांत्रिक आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की सेक्स म्हणजे पेनिट्रेशन. याउलट नात्यात शारीरिक ओढ, शरीर सुखासाठी दोघांची तयारी, जवळीक अर्थात फोरप्ले जोडल्याने तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे संबंध अधिक दृढ होऊन, हार्मोन्स ट्रिगर होऊन जवळ येण्यास मदत होऊ शकते.

फोर प्ले मुळे काय होते?

शारीरिक संबंध ठेवण्याआगोदर स्त्री आणि पुरुषाने किमान अर्धा तास फोर प्ले करणे आवश्यक असते. त्यामुळे स्त्री अधिक उत्तेजित होते आणि योनी भागामध्ये एक प्रकारचा चिकट स्त्राव निर्माण होतो. महिलांना शरीरसुखासाठी हा फोरप्ले महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यासाठी सेक्सच्या कृतीपेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. जर फोरप्लेमध्ये जास्त वेळ दिला नाही तर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओलसरपणा येत नाही आणि अशावेळी महिलेला संबंधांवेळी वेदना होतात. कधी कधी त्याला कामोत्तेजनाचा अनुभवही येत नाही. म्हणूनच फोरप्लेसाठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे.

फोर प्ले मध्ये काय करणं अपेक्षित आहे?

फोर प्लेच्या वेळी एकमेकांसोबत बोलणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला हव्यात. कोणत्याही महिलेला तिच्या कानांच्यामागे, पाठीवर हात फिरवणं खूप सुखद वाटतं. अनेक महिला छातीला स्पर्श केल्यानं उत्तेजित होतात. तर काहींना नाजूक भागांना स्पर्श करणं आवडतं.

तुमच्या पार्टनरचा कोणत्या प्रकारचा स्पर्श अधिक आनंददायी वाटतो हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यासाठी फोर प्ले आधी आणि नंतर तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलायला हवं. साधारणपणे बायकांना हे बोलण्यात संकोच वाटतो. काहींना अश्लिलही वाटतं मात्र सभ्यता, रोमान्स आणि शारीर ओढ यासाऱ्याचा मेळ या फोर प्ले मध्ये जमायला हवा.

Web Title: Sexual Health : Ways to Spice Up Your Sex Life With Foreplay what is foreplay need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.