Join us  

Sexual Health : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं का गरजेचं? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 7:05 PM

Sexual Health : शरीर संबंधांनंतर महिलांनी लघवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो.

विशिष्ट वयानंतर शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समाधानासाठी, संतुलनासाठी फिजिकल  रिलेशन ठेवणं साहाजिक आहे. अशावेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. संबंध ठेवताना काही बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. (Sexual Health)  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार  शरीर संबंध ठेवल्यानंतर लघवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं. पण अनेकांचा असा गैरसमज असतो, की शरीर संबंधांनंतर लघवीला गेल्यानंतर गर्भधारणा होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं असून लघवीला जाण्याचा गर्भधारणेशी थेट संबंध नाही. तरीही लघवीला जाणं का महत्वाचं असतं ते जाणून घेऊया.  (Why passing urine after physical relation is important for women know its benefit)

फिजिकल रिलेशननंतर युरिन पास करणं का गरजेचं?

शरीर संबंधांनंतर महिलांनी लघवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो.  संबंधादरम्यान पुरूषांच्या मुत्रातील बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशावेळी जर  संबंध ठेवल्यानंतर लघवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो. 

वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी

महिलांमध्ये इन्फेक्शनचा धोका जास्त का असतो?

शारीरिक संबंधानंतर महिलांना अनेकदा संसर्ग होण्याचा धोका असतो कारण या काळात मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात. ३० मिनिटांच्या आत लघवी करून नंतर प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ केल्याने हा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

पुरूषांसाठी संबंधानंतर लघवीला जाण कितपत गरजेचं?

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना लघवी करणे फारसे गरजेचे नाही. कारण त्यांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे लैंगिक संबंधादरम्यान संसर्गाचा असा विशेष धोका नसतो. अशा स्थितीत लघवी करायची की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.

प्रेग्नंसी टळण्याचे चान्स कितपत असतात?

शारीरिक संबंधानंतर लघवी करून गर्भधारणा टाळता येते हा गैरसमज वेळीच दूर व्हायल हवा.  महिलांना गर्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित सेक्सचा मार्ग निवडा. गर्भधारणेसाठी महत्त्वाचे असणारे शुक्राणू व्हल्व्हातून फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतात, कारण स्त्रियांची मूत्रमार्ग वेगळी असते, त्यामुळे त्याचा गर्भधारणेशी काहीही संबंध नाही.

जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

युरिन पास करताना जळजळ

शारीरिक संबंधानंतर महिलांना लघवी करताना जळजळ जाणवत असेल तर याला युरिन इन्फेक्शन समजू नका, ही समस्या 2 ते 3 दिवसात स्वतःच बरी होऊ शकते, परंतु बराच वेळ जळजळ जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉ. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :लैंगिक आरोग्यलैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप