पार्टनर जर भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा असेल तर, कुणालाही स्वप्न पूर्ण करण्यास मदत मिळते (Relationship Tips). लग्नानंतर स्वतःच्या ग्रोथसाठी पार्टनर सपोर्टिव्ह (Supportive Partner) असणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपल्या पार्टनरला हवं ते यश गाठता येतं. आता अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरीचीच (Gauri Khan) गोष्ट बघा ना. गौरीने शाहरुखच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये खूप मदत केली. शाहरुखच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. पण गौरीने शाहरुखची कधीच साथ सोडली नाही.
शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणीही अनेकांसाठी कायम प्रेरणादायी ठरली आहे. बऱ्याचदा शाहरुख आणि गौरीच्या नात्यात, शाहरुखचं कौतुक होतं. पण या नात्यात गौरीचाही तितकाच मोठा वाटा आहे. काळाच्या ओघात नात्याचे बंध अधिक घट्ट करण्यासाठी गौरीने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. जे नक्कीच शिकण्यासारखे आहेत(Shah Rukh Khan and Gauri's Love Story).
खिशात पैसे नाही तरीही..
शाहरुखच्या सुरुवातीच्या खडसर दिवसांमध्ये, गौरीने कधीच त्याची साथ सोडली नाही. हालाखीच्या दिवसात पैसे कमवणं कठीण होतं. या काळात गौरीने कायम शाहरुखला प्रेरणा दिली. अनेक नात्यांमध्ये असे दिसून आले की, जर आर्थिक चणचण असेल तर, नातेसंबंधात कटुता निर्माण होते. पण जर गौरीसारखा पार्टनर असेल तर, साथीदाराला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरणा मिळते.
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
पाठीशी भक्कमपणे उभी राहिली
अनेकांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, जी वाईट काळातही साथ सोडत नाही. हिंमत हारू देत नाही. ही व्यक्ती जर पार्टनर असेल तर, नक्कीच यश हे निश्चित आहे. आणि शाहरुखच्या आयुष्यात गौरी चिअरलीडर आहे.
घर आणि कुटुंबाची काळजी घेतली
शाहरुख खान जसजसा फिल्मी दुनियेत प्रगती करत गेला तसतसे त्याचे शेड्यूल बिझी होत गेले. त्याला कुटुंबाला फारसा वेळ देता आला नाही. अशावेळी गौरीच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली. तिने आपल्या मुलांचे आणि घराची पुरेपूर काळजी घेतली.
स्वतःचं करिअर घडवलं
शाहरुखच्या सर्व गोष्टी सांभाळून गौरीने स्वतःचं करिअरही घडवलं. आधी तिची ओळख शाहरुख खानची पत्नी एवढीच होती. परंतु नंतर तिच्या व्यवसाय आणि कौशल्याच्या जोरावर तिने इंटीरियर डिझायनिंगच्या जगात स्वतःचे नाव मोठे केले.