Join us  

जोडीदार आपला आदर करत नाही हे कसे ओळखाल? गमतीत मारलेले टोमणे पाहा, शेफाली शाह सांगते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 4:42 PM

Shefali Shah Talk about red flag in relationship that is Disrespect : नात्याचे बंध घट्ट हवेत तर असायलाच हवा एकमेकांबद्दल आदर...

कोणतंही नातं हे प्रेम, विश्वास, आदर, स्पेस या गोष्टींवर घट्ट टिकून असतं. एकदा नात्यातल्या या गोष्टी कमी व्हायला लागल्या की मग नात्यात तणाव निर्माण व्हायला लागतात. एकमेकांच्या सोबत राहताना आपल्याला जोडीदाराकडून या गोष्टी मिळाव्यात अशी आपल्या प्रत्येकाची किमान अपेक्षा असते. नातं जेव्हा फुलत जातं तेव्हा त्यात हे सगळं छान जुळून आलेलं आपल्याला दिसतं. पण एखादं नातं कमकुवत होत असताना त्या नात्यात या गोष्टींपैकी काही गोष्टींकडे अजिबात लक्ष दिलेले नाही हे लक्षात येते. अशी नाती दिवसागणिक तकलादू होत जातात आणि मग त्या नात्यांना केवळ नाव राहते पण २ व्यक्तींमध्ये असणारा संवाद, जोडलेपण हे कुठच्या कुठे गेलेले असते (Shefali Shah Talk about red flag in relationship that is Disrespect ). 

(Image : Google)

आदर ही कोणत्याही नात्यात असणारी किमान गोष्ट आहे. आपण समोरच्या व्यक्तीला आदर दिला तरच तो आपल्याला मिळतो आणि नात्याचे बंध घट्ट होण्यास त्याची मदत होते. पण याच आदराला अनेकदा तडा गेल्याचे आपण आजुबाजूला पाहतो. समोरच्या व्यक्तीचा अनादर करण्याची सुरुवात नेमकी कशी होते, हा नात्यातला सगळ्यात मोठा धोका कसा असतो हे उघडपणे बोलले जात नाही. अनेकदा गमती गमतीत, एकमेकांना टोमणे मारत अनादर कऱण्याची सुरुवात होते आणि इथेच नात्यात दुरावा येण्यास सुरुवात होते. प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांना या अनादराबाबत काय वाटतं याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं. यामध्ये त्या अनादर करण्याबाबत नेमकं काय म्हणतात पाहूया...

 

अनादर हा साधीशी गंमत करता करता सुरू होतो, त्यावेळी आपला अनादर झाला हेही अनेकांना समजत नाही. ती तशीच करते किंवा तो तर असंच करतो, त्याला थोडीच समजणार आहे अशा अगदी सामान्य वाटणाऱ्या वाक्यांतून तो सुरू होतो. पण एक वेळ अशी येते की अशाप्रकारची वाक्य ही गंमत राहत नाहीत तर समोरच्या व्यक्तीचा आदर कमी करणारी ठरतात.  अशावेळी तुम्हाला काही बोलायचं असेल आणि समोरचा काय प्रतिक्रिया देईल या भितीखातर तुम्ही बोलत नसाल तर ही गंभीर समस्या आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे असेही त्या म्हणतात. इतरांच्या समोर तुम्हाला चांगले, वाईट किंवा कुरुप असण्याची चिंता वाटत असेल तर ही समस्या वेळीच लक्षात घ्या असा सल्लाही शेफाली जाता जाता देतात. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप