Lokmat Sakhi >Relationship > लग्नाला झाली १२ वर्षे,आणि शिल्पा शेट्टी झाली इमोशनल! नवऱ्याला म्हणाली..

लग्नाला झाली १२ वर्षे,आणि शिल्पा शेट्टी झाली इमोशनल! नवऱ्याला म्हणाली..

Shilpa Shetty- Raj Kundra anniversary बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आज ॲनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवशी शिल्पा खूपच भावनिक झाली असून तिने पती राज कुंद्रा याच्यासाठी एक इमोशनल मेसेज लिहून तो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 04:36 PM2021-11-22T16:36:24+5:302021-11-22T16:36:55+5:30

Shilpa Shetty- Raj Kundra anniversary बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आज ॲनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवशी शिल्पा खूपच भावनिक झाली असून तिने पती राज कुंद्रा याच्यासाठी एक इमोशनल मेसेज लिहून तो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

Shilpa Shetty- Raj Kundra anniversary Celebration, Shilpa Shetty became emotional! Said to her husband .. | लग्नाला झाली १२ वर्षे,आणि शिल्पा शेट्टी झाली इमोशनल! नवऱ्याला म्हणाली..

लग्नाला झाली १२ वर्षे,आणि शिल्पा शेट्टी झाली इमोशनल! नवऱ्याला म्हणाली..

Highlightsशिल्पाची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा जणू वर्षाव होत आहे. 

Bollywood actress शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची जोडी बॉलीवूडमधील काही बेस्ट जोडींपैकी एक मानली जाते. पोर्नोग्राफी Pornography प्रकरणात राज कुंद्रा अडकला आणि त्यानंतर मात्र या जोडीकडे बघण्याचा चाहत्यांचा दृष्टीकोनच बदलून गेला. राज कुंद्राचं पोर्नोग्राफी प्रकरण होण्याआधी शिल्पा आणि तो नेहमी सोबतच दिसायचे. बहुतांश कार्यक्रमांना त्यांची जोडीनेच हजेरी असायची. पण त्यानंतर मात्र राज कुंद्रा अनेक दिवस तुरूंगात होता. आता तो जेलमधून बाहेर असला तरी ते दोघे जोडीने क्वचितच बाहेर दिसत आहेत. 

 

राज कुंद्रा त्या प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पासाठी प्रत्येक दिवस खूप कठीण होता. नवऱ्याच्या कृत्यामुळे तिलादेखील चौकशीला सामोरे जावे लागले होते. पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पादेखील राजला साथ देत असणार, तिचा देखील त्यात वाटा असणार, असे अनेक आरोप शिल्पावर केले गेले. पण असं सगळं होत असताना शिल्पाने मात्र तिचा संयम कधीच ढळू दिला नाही. शिल्पाने या परिस्थितीला ज्याप्रकारे तोंड दिले, ती या प्रकरणातून ज्या पद्धतीने बाहेर पडली आणि जितक्या शांतपणे तिने हा अवघड काळ सांभाळला, त्याबद्दल तिचे तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून कौतूक करण्यात येते. या प्रकरणानंतर राज आणि शिल्पा यांचे नातेही बदलेल का? नात्यामध्ये काही वेगळे वळण येईल का? अशी बरीच चर्चाही त्या काळात तिच्या चाहत्यांमध्ये दिसून आली. पण ॲनिव्हर्सरीनिमित्त एक भली मोठी पोस्ट सोशल मिडियावर शेअर करून शिल्पानेच या सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. 

 

२२ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे राज- शिल्पा यांची ॲनिव्हर्सरी. त्यामुळे शिल्पाने २१ नोव्हेंबरला रात्रीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. शिल्पाच्या लग्नाला तब्बल १२ वर्षे पुर्ण झाली असून शिल्पाने या निमित्ताने तिने तिचे आणि राजचे त्यांच्या लग्नातले अनेक फोटो कोलाज करून इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. एवढेच नाही तर तिने राजसाठी खूपच इमोशनल मेसेजही लिहिला आहे. यामध्ये शिल्पा म्हणते की, १२ वर्षांपुर्वी याच दिवशी आपण दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं, चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांना साथ देण्याचं, एकमेकांवर विश्वास ठेवण्याचं... आणि त्यासाठी देव आपल्याला मार्ग दाखवत आहे... 12 years and not counting… Happy Anniversary, Cookie!.. असे म्हणत शिल्पाने राजला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टच्या शेवटी शिल्पाने कठीण, अवघड प्रसंगी त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभारही मानले आहेत. आभार मानताना ती म्हणते... Heartfelt gratitude to all our well-wishers, who have been with us through thick and thin🙏🌈♥️🧿


शिल्पाची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर social media चांगलीच व्हायरल झाली आहे. तिच्या चाहत्यांनीही तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या असून शिल्पाच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा जणू वर्षाव होत आहे. 
 

Web Title: Shilpa Shetty- Raj Kundra anniversary Celebration, Shilpa Shetty became emotional! Said to her husband ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.