रिलेशनशिप म्हटलं की रुसवे - फुगवे, कट्टी बट्टी ही होतेच. मात्र, काही वेळेला आपला पार्टनर आपल्यावर विचारांचे दबाव टाकतो. पार्टनरची चीडचीड आपल्याला काही वेळेला सामान्य वाटते. मात्र, हीच चीडचीड हाणामारीत होत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. आपण आपल्या पार्टनरची मानसिक आणि शारीरिक छळ सहन करतो कारण, आपल्याला नाते टिकवायचे असते. या स्थितीला ट्रॉमा बॉण्ड असे म्हणतात. ट्रॉमा बॉण्डची चिन्हे ओळखणे आणि त्यातून बाहेर पडणे फार महत्वाचे आहे. कारण कधीकधी त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.
ट्रॉमा बॉन्डमधून कसे बाहेर पडाल
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा
जर आपला पार्टनर काही तरी चुकीचं घडल्यावर सॉरी म्हणत असेल तर उत्तमच आहे. परंतु, त्याच्या चांगल्या वागणुकीवर विश्वास ठेवताना विचार करा. सध्या तुमच्यासोबत जे घडत आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. सद्यस्थितीचा विचार करून निर्णय घ्या.
पुराव्याकडे लक्ष द्या
जर तुमचा जोडीदार तुम्हाला शिवीगाळ करत असेल किंवा मारहाण करत असेल, परंतु तरीही तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत असाल तर सावधगिरी बाळगा आणि अशा नात्यातून ताबडतोब बाहेर पडा. अशा गोष्टी जीवावर बेतू शकते.
स्वतःशी बोलून निष्कर्ष काढा
अनेक वेळा स्वतःशी बोलून अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात. कारण आपल्याला आपली परिस्थिती इतरांपेक्षा चांगली माहिती असते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःशी बोला आणि निष्कर्ष काढा.