Lokmat Sakhi >Relationship > नवरा-बायकोचं पटतंच नाही? सुधा मूर्ती सांगतात ३ गोल्डन रुल्स; संसार होईल सुखाचा-आनंदी राहाल

नवरा-बायकोचं पटतंच नाही? सुधा मूर्ती सांगतात ३ गोल्डन रुल्स; संसार होईल सुखाचा-आनंदी राहाल

Sudha Murthy 3 Golden Tips For A Successful Marriage : भांडणात नवरा-बायकोपैकी एक नाराज असेल तर दुसऱ्याने शांत राहावं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:34 PM2024-08-03T22:34:31+5:302024-08-03T22:39:48+5:30

Sudha Murthy 3 Golden Tips For A Successful Marriage : भांडणात नवरा-बायकोपैकी एक नाराज असेल तर दुसऱ्याने शांत राहावं.

Sudha Murthy 3 Golden Tips For A Successful Marriage : Sudha Murthy Shares A Golden Relationship Tips | नवरा-बायकोचं पटतंच नाही? सुधा मूर्ती सांगतात ३ गोल्डन रुल्स; संसार होईल सुखाचा-आनंदी राहाल

नवरा-बायकोचं पटतंच नाही? सुधा मूर्ती सांगतात ३ गोल्डन रुल्स; संसार होईल सुखाचा-आनंदी राहाल

प्रसिद्धा लेखिका, मोटिव्हेशनल स्पिकर, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murthy) या नेहमीच पालकांना आणि जोडप्यांना मोलाचे सल्ले देतात. पालकत्व, नातेसंबंध अधिक चांगले होण्यासाठी मदत म्हणून त्यांनी अनेक पुस्तकांमधून आपले  विचार मांडले आहेत. (Relationship Tips) त्यांची अनेक प्रेरणादायी पुस्तक प्रचलित आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी लग्न टिकवण्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आहेत. लग्न टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते त्यांनी सांगितले आहे. (Sudha Murthy 3 Golden Tips For A Successful Marriage) 

लग्नानंतर भांडण होणारच

सुधा मूर्ती सांगतात जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा भांडणं होणार हे नक्की आहे. जर तुम्ही असं म्हणाल की तुमच्यात भांडणं होतच नाही मग तुम्ही नवरा बायको नाही.

पोट खूप सुटलंय-डाएट करणं जमत नाही? रामदेव बाबा सांगतात ३ सोपे उपाय; घटेल वजन

कोणीही परफेक्ट नसते

आयुष्य हे गिव्ह एण्ड टेक या तत्वाप्रमाणे असते. इथे कोणतेही जोडपं परफेक्ट नसते. माझेही स्वत:चे प्लस,मायनस आहेत असं त्या सांगतात. नात्यात भांडणं होऊ नयेत, नात्याचा गोडवा टिकून राहावा यासाठी  सुधा मूर्ती त्याचे पती नारायण मूर्ती यांच्यासोबतच्या नात्यातील अनेक उदाहरणं, टिप्स देतात.

जेव्हा एक व्यक्ती बोलते तेव्हा दुसऱ्याने तोंड बंद ठेवावं

भांडणात नवरा-बायकोपैकी एक नाराज असेल तर दुसऱ्याने शांत राहावं. एक पार्टनर बोलत असेल तर दुसऱ्याने तोंड बंद ठेवावे. हीच पद्धत सर्व भांडणांना लागू होतं. असं त्यांचं मत आहे.

शरीर पोखरुन टाकते व्हिटामिन बी-१२ ची कमतरता, ४ व्हेज पदार्थ खा-शरीर होईल मजबूत

एकमेकांना मदत करावी

नवरा-बायकोनं नेहमी एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची मदत करायला हवी. त्या पुरूषांना सांगतात की सर्व काही पत्नीच करेल अशी अपेक्षा ठेवू नका. खासकरून जेव्हा महिला कामासाठी घराबाहेर पडत असतील तर अधिक समजून घ्या. या पिढीच्या सर्व पुरूषांनी महिलांना किचनमध्ये मदत करायला हवी. पुरूषांनी पत्नीच्या मनावरचा भार हलका करायला हवा. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करून विकासास मदत करावी. 

Web Title: Sudha Murthy 3 Golden Tips For A Successful Marriage : Sudha Murthy Shares A Golden Relationship Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.