Join us  

प्रत्येक बायकोनं नवऱ्याला न सांगता करावी १ गोष्ट; सुधा मूर्ती सांगतात सुखी संसाराचं सोपं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 2:08 PM

Sudha Murthy Relationship Tips :महिलांसाठीही आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे.

सुधा मूर्ती (Sudha Murthy) या प्रसिद्ध लेखिका, एक शिक्षिका आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. याशिवाय सुधा मूर्ती या एक मोटिव्हेशनल स्पिकरसुद्धा आहेत. (Sudha Murthy Relationship Tips) सुधा मूर्तीनी महिलांना काही अशा गोष्टी सांगितल्या आहे. (Wife Should Do this Work Secretly From Husband Sudha Murthy Gives Marriage Advice)

सुधा मूर्तींनी सांगितलं की ऑडियंसमध्ये बसलेल्या प्रत्येक महिलेलं आपल्या पतीपासून लपवून  बचत करायला हवी.  आपल्या सेव्हिंग्साबाबत कधीच कोणाला सांगू नये. असं केल्याने त्यांचे पैसे लवकरात लवकर खर्च होत नाहीत. कारण पुरूषांना जेव्हाही कळतं की घरात पैसे आहेत. त्यानंतर ते पैसे खर्च करण्यासाठी खूपच व्याकूळ होतात.

पतीला फायनेंशियल सपोर्ट करण्यासाठी नोकरी करणं गरजेचं आहे.  महिलांनी आपल्या समझदारीने घर चालवण्यासाठी दिलेल्या पैशांमध्ये बचत करू शकताात. गरज लागल्यास या पैशांची पतीला सपोर्ट करता येतो. कमी पगारात पैसे वाचवण्याचे कौशल्य महिलांकडे असते. 

1) नात्यात आदर महत्वाचा

लहानपणापासूनच एकमेकांचा आदर करावा असे शिकवले जाते. पण लग्नानंतर बरेच लोक ही गोष्ट विसरून जातात. सुधा मूर्तींच्यामते लग्नानंतर दोघांमध्ये प्रेमाबरोबरच सन्मानही वाढायला हवा. तरंच नातं  चांगलं निभावता येतं. चांगल्या, वाईट काळात नेहमीच एकमेकांच्या सोबत असायला हवं.  तेव्हाच लग्नासारखं पवित्र नातं व्यवस्थित निभावता येतं. 

८०० किलो नकली पनीर जप्त, भेसळयुक्त पनीरमुळे कॅन्सरचा धोका; FSSI सांगते ३ सेकंदात ओळखा भेसळयुक्त पनीर

2) महत्व 

कोणत्याही नात्यात प्रेम असणं फार महत्वाचे असते. आजकाल लोक पैशांना अधिक महत्व देतात. आजकाल सगळ्यात जास्त नाती पैसा पाहून तयार होतात. सुधा मूर्ती सांगतात की ज्या लग्नांचा आधार पैसा हा असतो अशी लग्न कधीच टिकत नाहीत. २ लोकांच्य मधील प्रेम कधीच पैशांमुळे कमी होऊ नये. ज्यामुळे नातं कमकुवत होऊ शकतं. 

टॅग्स :सुधा मूर्तीरिलेशनशिप