Join us  

"तिचं आणि माझं नातं अशा वळणावर आहे की...." सुधा मुर्ती काय सांगतात सूनबाईशी आपलं नातं नेमकं कसं आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 3:30 PM

Sudha Murthy And Her Daughter In Law: सुधा मुर्ती पहिल्यांदाच त्यांच्या आणि त्यांच्या सुनेच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या आहेत...

ठळक मुद्देसूनेशी त्यांची नातं कसं आहे? सुधा मुर्तींच्या सूनबाई म्हणजेच अपर्णा कृष्णन. त्या दोघींचं नातं नेमकं कसं आहे?

सुधा मुर्ती. श्रीमंत आणि लोकप्रिय आहेतच. त्यांच्या शब्दालाही समाजाला मान आहे आणि तरी त्या अत्यंत साधेपणानं सर्वांशी संवाद साधतात. त्या साधेपणाचीही चर्चा होते. एका देशाच्या पंतप्रधानांच्या सासूबाई असूनही त्या सर्वसामान्यांशी जी अगदी सहजतेने नाळ जोडतात, त्याचं भल्याभल्यांना कौतुक वाटतं. व्यावसायिक-सार्वजनिक आयुष्यात त्या कशा राहतात हे सर्वांना माहिती आहेच. मात्र त्या सासूही आहेत (Sudha Murthy reveals about her relation with her daughter in law). सूनेशी त्यांची नातं कसं आहे? सुधा मुर्तींच्या सूनबाई म्हणजेच अपर्णा कृष्णन (Aparna Krishnan). त्या दोघींचं नातं नेमकं कसं आहे?(Sudha Murthy And Her Daughter In Law)

 

सुधा मुर्ती यांनी लिहिलेल्या कथांना डिजिटल स्वरुपात आणण्याचं मुख्य काम सध्या अपर्णा करत आहेत.  

औक्षणाची सुंदर थाळी घ्या कमी किमतीत, बघा ३ सुबक पर्याय- औक्षणाचा कार्यक्रमाला येईल खास नूर

हिंदूस्थान टाइम्सची बातमी सांगते की "Story Time with Sudha Amma" या नावाने सुधा मुर्ती यांच्या कथा यु ट्यूबवर लाँच होत आहेत. खरंतर सासू- सून असं एकत्र काम करतात म्हटल्यावर कामाच्या ठिकाणीही खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सुधा मुर्ती म्हणतात की माझं आणि अपर्णाचं नातं आता एका वेगळ्या वळणावर आहे. या गोष्टी मी लिहिल्या असल्या तरी त्यांना डिजिटल स्वरूप देण्यासाठी अपर्णा जे काय करते, त्यात मी कधीच हस्तक्षेप करत नाही. कारण ते संपूर्णपणे तिचंच कार्यक्षेत्र आहे. कारण मी असं मानते की आमच्या या एकत्रित प्रोजेक्टमधलं कंटेन्ट जरी माझं असलं तरी ते अपर्णाचं 'बाळ' आहे. त्यामुळे त्याच्यावर कसे संस्कार करून ते यु- ट्यूबच्या माध्यमातून लोकांपुढे आणायचं हे तिचं काम आहे.

 

फक्त कामाच्याच बाबतीत नाही तर वैयक्तिक पातळीवरही आम्ही एकमेकींच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही.

सारा अली खानने फक्त २ आठवड्यात केले वजन कमी, तिचे डाएट ट्रेनर सांगतात कसे केले डाएट..

कारण आमच्या दोघींकडेही तेवढा वेळ नाही. ती तिच्या कामात व्यस्त असते तर मी सतत ट्रॅव्हलिंग, लिखाण आणि माझी इतर कामं करत असते. “She is good, efficient and she will do a good job why should I worry?" अशा  शब्दांत त्यांनी त्यांच्या सुनेचं कौतूकही केलं आहे. प्रत्येक सासू- सुनेचं नातं या वळणावर आलं तर बहुतांश घरातल्या निम्म्या कटकटी कमी होतील. नाही का?

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपसुधा मूर्ती