Join us  

Teddy Day : ...म्हणून मुलींना आवडतात ‘या’ रंगांचे टेडी, कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 11:26 AM

Teddy Day: १० फेब्रुवारी म्हणजे टेडी डे, गुबगुबीत-मऊमऊ टेडी कोणाला नाही आवडत, आणि असा टेडी गिफ्ट मिळाला तर विचारायलाच नको...तुम्हालाही टेडी गिफ्ट करायचा असेल तर माहितच हव्यात अशा गोष्टी...

ठळक मुद्देमुलींना कोणत्या रंगाचा टेडी आवडू शकतो याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. ज्यामुळे आपण देतो ते गिफ्ट समोरच्या मुलीला आवडेल आणि ती आपल्या जास्त प्रेमात पडेल. खरेपणा म्हणूनही पांढऱ्या रंगाकडे पाहिले जाते. हा टेडी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा मित्र-मैत्रीणींनाही आवर्जून देऊ शकता.

टेडी म्हणजे मुलींचा जीव की प्राण. गुबगुबीत टेडीला Teddy जवळ घेऊन बसलं की एकप्रकारचं कम्फर्ट फिलिंग येतं. तर टेडी यासाठी दिला जातो की जेव्हा आपण आपल्या खास व्यक्तीच्या जवळ नसतो तेव्हा आपली कमी हा टेडी भरुन काढेल. व्हॅलेंटाईन्स वीकमधील Valentines Week टेडी डे Teddy Day हा खास एकमेकांना टेडी गिफ्ट करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला आपण ज्याप्रमाणे गुलाब Rose , चॉकलेट Chocolate किंवा एखादी किस Kiss आणि मिठी Hug देतो त्याचप्रमाणे आज टेडी देण्याची पद्धत आहे. डेज चे फॅड हे पाश्चात्य देशातील आहेत असे म्हटले जात असले तरी गेल्या काही वर्षांपासून भारतात हे सगळे दिवस तरुणाई मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसते. 

साधारणपणे मुलं आपल्या आवडत्या मुलीला हा टेडी बियर Teddy bear प्रेमाने भेट देतात. अनेकदा मुलींच्या पूर्ण खोल्या त्यांच्या आवडत्या टेडीने भरलेल्या असतात, तर कधी त्या चक्क टेडीला जवळ घेऊनच झोपतात. आमुलींना टेडी देताना तो केवळ मोठा असला पाहिजे असे नाही तर त्याचे मटेरीयल एकदम सॉफ्ट असायला हवे. त्याचे डोळे बोलके आणि आकर्षक वाटतील असे असायला हवेत. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टेडीचा रंग. साधारणपणे मुलींना कोणत्या रंगाचा टेडी आवडू शकतो याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. ज्यामुळे आपण देतो ते गिफ्ट समोरच्या मुलीला आवडेल आणि ती आपल्या जास्त प्रेमात पडेल. त्यामुळे तुम्हालाही टेडी खरेदी करायचा असेल आणि नेमका कोणत्या रंगाचा कसा घ्यावा हे कळत नसेल तर या टिप्स नक्की वाचा....

लाल रंगाचा टेडी 

लाल रंग हा कायमच प्रेमाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे हार्टही लाल रंगाचे असते. गुलाब द्यायचा असेल तरी आपण लाल रंगाचा देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल तर तुम्ही तिला लाल रंगाचा टेडी नक्की भेट देऊ शकता. यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर खूश तर होईलच पण तिचेही तुमच्यावर असलेले प्रेम यामुळे वाढेल. 

गुलाबी रंगाचा टेडी

मुलींना साधारणपणे गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंगातच राणी कलरपासून बेबी पिंकपर्यंत अशा बऱ्याच शेड्स उपलब्ध असतात. लाल रंगाप्रमाणेच गुलाबी रंगही प्रेमाचा रंग मानला जातो. रोमान्स आणि प्रेम दर्शविण्यासाठी साधारणपणे गुलाबी रंग वापरला जातो. तुम्ही अजूनपर्यंत तुमचं प्रेम व्यक्त केलं नसेल तर गुलाबी रंगाचा टेडी देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना पोहोचवू शकता. 

पांढऱ्या रंगाचा टेडी 

पांढरा रंग हा कायम शांततेचं प्रतीक मानला जातो. त्याबरोबरच खरेपणा म्हणूनही पांढऱ्या रंगाकडे पाहिले जाते. हा टेडी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा मित्र-मैत्रीणींनाही आवर्जून देऊ शकता. तुमचे नाते किती खरे आणि अतूट आहे हे दर्शवणारा हा टेडी दिल्यास समोरच्याच्या मनात नात्याविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत होऊ शकते. 

चॉकलेटी रंगाचा टेडी

या रंगामध्ये टेडी एकदम मस्त दिसतो. चॉकलेटी रंगाचा टेडी देण्याचा अर्थ की टेडी देणारी व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे. तेव्हा जर तुम्हाला हा टेडी मिळाला तर समोरचा काही कारणाने आपल्यावर चिडला आहे हे समजून घेऊन त्या व्यक्तीची समजूत काढायला तयार रहा. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपव्हॅलेंटाईन वीकव्हॅलेंटाईन्स डे