Lokmat Sakhi >Relationship > श्रीजेश मानलं तुला! हॉकीस्टीकवर बायकोचं नाव; म्हणतो- जगानं मला ‘तिचा नवरा’ म्हणून ओळखावं कारण..

श्रीजेश मानलं तुला! हॉकीस्टीकवर बायकोचं नाव; म्हणतो- जगानं मला ‘तिचा नवरा’ म्हणून ओळखावं कारण..

The Indian Hockey Team Goalkeeper Sreejesh PR: भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर श्रीजेश म्हणतो माझ्या बायकोचा मला अभिमान आहे कारण.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2024 05:27 PM2024-08-05T17:27:55+5:302024-08-05T17:29:37+5:30

The Indian Hockey Team Goalkeeper Sreejesh PR: भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर श्रीजेश म्हणतो माझ्या बायकोचा मला अभिमान आहे कारण.... 

The Indian hockey Team Goalkeeper Sreejesh PR speaks i would be so proud to be known as the doctor's husband | श्रीजेश मानलं तुला! हॉकीस्टीकवर बायकोचं नाव; म्हणतो- जगानं मला ‘तिचा नवरा’ म्हणून ओळखावं कारण..

श्रीजेश मानलं तुला! हॉकीस्टीकवर बायकोचं नाव; म्हणतो- जगानं मला ‘तिचा नवरा’ म्हणून ओळखावं कारण..

Highlightsअनिशा आणि श्रीजेश यांचा प्रेमविवाह. ते एकाच महाविद्यालयात शिकत होते. श्रीजेश खेळाकडे वळाला तर अनिशा आयुर्वेदीक डॉक्टर आहे. 

भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिकमध्ये शानदार खेळ करत आहे. त्यामुळे हॉकी संघातल्या खेळाडूंचे कौतूक तर सोशल मिडियावर होतेच आहे. तसंच कौतूक टीमचा गोलकीपर श्रीजेश पीआर याचेही होत आहे. त्याच्या खेळामुळे तर तो अनेकांसाठी हिरो आहेच. पण त्याच्याबाबतीत अशी एक गोष्ट समोर आली आहे की ते पाहूनच अनेकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलून गेला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याचं त्याच्या बायकोवर असलेलं भरभरून प्रेम. त्याचं बायकोवर एवढं  प्रेम आहे की त्याच्या हॉकीस्टीकवरही त्याने तिच्याच नावचं स्टिकर लावून घेतलं आहे. (The Indian hockey Team Goalkeeper Sreejesh PR speaks i would be so proud to be known as the doctor's husband)

 

नुकत्याच झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटन संघाचा पराभव केला. यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी श्रीजेशने त्याची हॉकीस्टिक उंचावली तेव्हा त्याच्या स्टिकवर 'अनिशा' असं त्याच्या बायकोचं नाव दिसून आलं.

श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही 

एवढंच नाही तर त्याने मोठ्या कौतूकाने स्टिक पुढे करत ते नाव कॅमेऱ्यासमोर धरून दाखवलंही.. अनिशा आणि श्रीजेश यांचा प्रेमविवाह. ते एकाच महाविद्यालयात शिकत होते. श्रीजेश खेळाकडे वळाला तर अनिशा आयुर्वेदीक डॉक्टर आहे. 


 

श्रीजेशच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग shethepeoplenews या इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तो म्हणतो की अनिशा खूप हुशार आहे. तिला तिचं काम खूप आवडतं. त्यामुळे मला असं कधीच वाटत नाही की तिने तिचं काम साेडून घरात बसावं. माझ्या मुलांकडे, घराकडे लक्ष द्यावं.

पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले? खोबऱ्याचा करा खास वापर- चेहरा होईल स्वच्छ- नितळ

उलट मला असं वाटतं की तिने तिच्या कामात खूप जास्त प्रगती करावी आणि एक दिवस 'तिचा' नवरा म्हणून मला ओळख मिळावी.. श्रीजेश म्हणतो की ही गोष्ट त्याच्यासाठी खूप खूप अभिमानाची असेल. श्रीजेशसारखा विचार जर आपल्या देशातल्या नवऱ्यांनी केला तर कशाला कोणती स्त्री तिचं करिअर सोडून घरी बसेल सांगा बरं.....

 

Web Title: The Indian hockey Team Goalkeeper Sreejesh PR speaks i would be so proud to be known as the doctor's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.