Join us  

डोळ्यावर झापडं लावून लग्नाचा निर्णय घेताय की रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग दिसतात तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 6:48 PM

They say love is blind. So what are some of the green and red flags to look for in an early committed relationship? प्रेमात पडून किंवा अरेंज मॅरेज असो, लग्न ठरवताना तुम्ही इमोशनल होता की तुम्हाला नात्यातले धोके आणि आनंदही दिसतात?

एखादं गोड कपल दिसलं की आपण त्यांना 'रब ने बना दी जोडी' अशी उपमा देतो. गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात खरे पण, आपला जोडीदार हा आपल्यालाच शोधावा लागतो. बहुतांश वेळी जोडीदार शोधण्यात घरचे मदत करतात. परंतु हल्ली अनेक जोडप्यांमध्ये बोलण्यात ग्रीन फ्लॅग, रेड फ्लॅग असे शब्द येतात.

नात्यात हे नेमकं नवीन प्रकरण काय आहे? हे झेंडे नेमके कोणते अलर्ट सांगतात? प्रेमात असाल, ठरवून लग्न असेल आणि लग्नाचा फायनल निर्णय घ्यायचा असेल तर अनेकजण हे रेड फ्लॅग किती आणि ग्रीन फ्लॅग किती असं मोजून निर्णय घेतात(They say love is blind. So what are some of the green and red flags to look for in an early committed relationship?).

रेड फ्लॅग - ग्रीन फ्लॅग म्हणजे काय?

रेड फ्लॅग म्हणजे आपल्या पार्टनरच्या स्वभावात असे कोणते गुण आहे ज्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते. उदा. प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणे, संशय घेणे, प्रश्न विचारणे, अती पझेसिव्ह, रिसपेक्ट न करणे अशा गोष्टी दिसल्या तर त्याला म्हणतात रेड फ्लॅग. प्रत्येक गोष्टीसाठी एक रेड फ्लॅग.

दुसरीकडे ग्रीन फ्लॅग म्हणजे नात्यात समजूतदारपणा असणे, समंजस, शांत, रोमॅण्टिक, रिसपेक्ट, विश्वास, हे सारं जाणवलं तर ग्रीन फ्लॅग दिले जातात.

रेड आणि ग्रीनपलिकडे अजून नक्की काय तपासायचे?

विश्वास हवा

वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, जीवनात यशस्वी होण्यासाठी विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्या पार्टनरला तुमच्यावर किंवा रिलेशनशिपवर विश्वास नसेल, तर याचा अर्थ त्याला तुमच्यासोबत भविष्य दिसत नाही. जी पूर्ण विश्वास ठेवू शकेल, सोबत राहील त्याला ग्रीन फ्लॅग म्हणा.

ध्येय काय?

जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील असा जोडीदार हवा. आताच जर तो तुमच्या निर्णयांना किंमत देत नसेल तर काय उपयोग? त्याच्या आणि तुमच्या जगण्याचं ध्येय काय? हे पाहा.

लग्नासाठी जोडीदार निवडताना ३ गोष्टी तपासून पाहा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर देतात तरुण मुलांना सल्ला

संवाद आहे का?

नात्यात संवाद हवा. जिथे दोन लोक एकमेकांचे ऐकायला तयार असतात, तिथे नात्यात दुरावा येत नाही. संवाद ही आनंदी नात्याची गुरुकिल्ली मानली जाते. जर तुमचा पार्टनर मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करत असेल तर, निश्चित तुमची केमिस्ट्री खूप सुंदर असावी. जर प्रियकर बोलायला - संवाद साधायला वारंवार टाळाटाळ करीत असेल तर तो रेड फ्लॅग.

संशयी तर नाही?

छोट्याश्या गोष्टीवरून संशय घेतला जातो आहे का प्रश्न विचारले जातात का, हे पाहा.

बॉयफ्रेण्ड तुमच्याशी सतत खोटं बोलतोय हे कसं ओळखाल? ३ गोष्टी- तुमची फसवणूक तर होत नाही..

चूक कबूल करतो का?

स्वतःची चूक मान्य करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तो त्याच्या चुका मान्य करत नसेल, किंवा त्याच्याकडून घडलेल्या चुकांचं खापर तुमच्यावर फोडत असेल तर, अशा व्यक्तींपासून लांब राहणे योग्य. अशा व्यक्तीसोबत आयुष्यभर आनंदाने जगता येणार नाही.

सतत बिझी की..

तो सतत बिझी असतो की वेळ काढतो तुमच्यासाठी, याची नोंद ठेवा.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप