Join us  

मला इग्नोर करणं शक्यच नाही! फस्ट इम्प्रेशनवरच यशस्वी होण्याचा काळ आता गेला कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 3:31 PM

अमूक एकजण केवळ भारी दिसतो, चुरचुरीत बोलतो, शो-शा करतो/करते म्हणून ते टॅलेण्टेड हे समजण्याचा काळ आता उरला नाही.

फार शो-शा करते. डोक्यात भूसा, तोंड उघडलं की कचरा पण  राहते इतकी भारी की कुणीही सहज इम्प्रेस होतो. त्यांनाच प्रमोशन पण मिळतात, आपण मागे पडतो. अशी चर्चा तुम्ही मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये, ऑफिस कलीगमध्ये केलीच असणार. आपल्या अवतीभोवती काहीजण अत्यंत प्रेझेण्टेबल असतात. दिसतात सुंदर, राहतात टापटीप. फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे आपण ऐकलेलंच असतं. पण यासाऱ्यात आपण हे विसरुन जातो की पहिलं इम्प्रेशन कितीही भारी असलं तरी मुळातच जर काही टॅलण्ट नसेल तर पुढे सगळा फ्लॉप शो होतो.इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इम्प्रेशन कितीही भारी मारलं आणि त्यामुळे काही काळ विशेष कष्ट न घेता आपली पत वाढते, पण ती टिकते का सदैव, विचार करा?

(Image : google)

त्यालाच मग इतर लोक भास मारणे असे हिणवू लागतात. सगळं लोकांना दाखवण्यासाठी. त्यांनी आपल्याला भारी म्हणावं, आपलं लाइफ हॅपनिंग आहे असं म्हणावं, लाइक्स लव्हचा मारा व्हावा सोशल मीडियात म्हणून हे सुरु होतं. आज हे कौतुक. उद्या ते वाद्यं, पुन्हा ते कौतुक, अशीच सवय लागू शकते. केवळ काहीतरी सनसनाटी, भारी, वेगळे, जबरदस्त वाटेल असे वारंवार आणि वरवर फ्लॅश करून आपले "स्टेटस" वाढते, अशी भावना मिळत असेल, तर प्रत्यक्ष कष्ट कोण घेणार? नाहीच घेतले जात. आणि मग धड काहीच न होता केवळ इतरांना दाखवण्यासाठी आपण जगतो, जे अर्थात फसवं असतं  आणि जिथं अस्सल कस लागतो तिथं आपण कमीच पडताे किंवा बाद होतो. आपल्याकडे असणाऱ्या आणि आपल्याला, इतरांना "भारीतल्या" वाटणाऱ्या गोष्टी आपण फ्लॅश करू लागतो. भाळणारे त्यानेही भाळतात. भुलणारे त्यालाही भुलतात. पण आपलं काय? आपली पत, आपले स्टॅण्डर्ड सतत दुसऱ्याच्या नजरेतून आणि मान्यतेतून आपण मिळवत राहणार.  आभास तयार करणार. आणि प्रत्यक्षात आपलं आयुष्यच पोकळ पायावर उभे राहणार?त्यामुळे केवळ भास मारणे आणि कष्ट करणे, इतरांना दाखवणे आणि आपण खरंच आतून बदलणे, नव्या गोष्टी शिकणे, समृद्ध होणे, मनापासून आनंदी असणे हे सारं कसं होणार?तेव्हा आपण ठरवायचं की आपण खरंच आनंदी आहोत की इतरांना केवळ तसं दाखवतोय?

 

टॅग्स :रिलेशनशिप