Join us  

पार्टनर तुमच्यावर इमोशनली अतीच डिपेंड आहे? अशा जोडीदाराशी जमवून घेण्याच्या ५ सोप्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 7:25 PM

Tips for How To Deal With Emotionally Dependent Partner : जे लोक भावनिकरित्या आपल्यावर डिपेंड असतात ते त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यात काही वेळा अडचणी येतात.

ठळक मुद्देज्या जोडीदाराला आपली जास्त गरज आहे हे तुम्हाला माहित असेल त्यांना कोणत्याही अटीशिवाय प्रेम, काळजी आणि लक्ष द्या. जोडीदारांमधील दोघांनी एकमेकांना काही गोष्टी अतिशय क्लिअर ठेवायला हव्यात, म्हणजे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत. 

नात्यामध्ये तुम्ही प्रत्येक क्षणी तुमच्या पार्टनरसोबत असणे अतिशय आवश्यक असते. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इमोशनली कनेक्ट असणे गरजेचे असते. तुम्ही पार्टनरसोबत इमोशनली कनेक्टेड असाल तर तुमच्यातले रिलेशन आणखी स्ट्रॉंग होण्यास मदत होते. पार्टनरशी इमोशनली कनेक्टेड असणे आणि खूप जास्त प्रमाणात इमोशनली डिपेंड असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचा पार्टनर तुमच्यावर भावनिकरित्या डिपेंड असेल तर त्याला प्रत्येक पायरीवर तुमच्या आधाराची, मान्यतेची आवश्यकता असते. कोणताही निर्णय घेताना, एखाद्या गोष्टीला सामोरे जाताना या व्यक्तींना खंबीर पाठिंबा लागतो. अशा लोकांना एकट्याने वेळ घालवण्याची भिती वाटते, इतकेच नाही तर अशावेळी ते काहीसे काळजीत पडतात. जे लोक भावनिकरित्या आपल्यावर डिपेंड असतात ते त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यात काही वेळा अडचणी येतात. त्यामुळे हे लोक भावना व्यक्त करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी इतरांचा आधार घेतात (Tips for How To Deal With Emotionally Dependent Partner). 

पार्टनर भावनिकरित्या आपल्यावर अवलंबून आहे हे कसे ओळखाल? 

1.ज्या लोकांना कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी किंवा पार्टनर म्हणून तुम्ही संपर्क केला नाही किंवा एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर अस्वस्थ वाटते.

2.कोणत्याही लहानातल्या लहान किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीसाठी या लोकांना तुमची मान्यता लागते.

3.पार्टनर म्हणून तुम्ही भावनिक असणाऱ्या लोकांच्या आसपास नसाल तर ते आयुष्यातील दरी भरुन काढण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आधार घेतात.

4.कोणत्याही गोष्टीसाठी हे लोक वारंवार आश्वासन घेतात, कारण त्यांना एखादा निर्णय घेण्यात अडचणी येतात. 

5.अशा लोकांना निर्णय घेणे काहीसे अवघड तर जातेच पण ते काहीसे चिवट स्वभावाचे असल्याचेही आपल्याला दिसते. 

भावनिकरित्या अवलंबून असणाऱ्या जोडीदाराशी कसे वागायचे? 

1.हो लोक तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत ते त्यांना सकारात्मक पद्धतीने वारंवार सांगत राहा. त्यांना तुमच्या मनातील रुड किंवा नकारात्मक भावना पास होतील असे शक्यतो वागू नका.

2.तुम्ही नातेसंबंधात असाल तरी या नात्याला काही सीमा घाला आणि त्या नात्यापासून काही वेळ का होईना दूर राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला स्वत:चाही थोडा वेळ मिळेल.   

3.एखाद्याला आपल्यापेक्षा एखाद्या गोष्टीची ( भावनिक आधार, सोबत) यांची आवश्यता असू शकते. याबाबत जोडीदारांमधील दोघांनी एकमेकांना काही गोष्टी अतिशय क्लिअर ठेवायला हव्यात, म्हणजे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत. 

4.जोडीदारासोबत घरापेक्षा घराबाहेर गुणवत्तापूर्ण वेळ खर्च करा. 

5.ज्या जोडीदाराला आपली जास्त गरज आहे हे तुम्हाला माहित असेल त्यांना कोणत्याही अटीशिवाय प्रेम, काळजी आणि लक्ष द्या. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप