Join us  

माझ्यावर ती आईसारखी माया करते! अभिनेत्री तितिक्षा तावडे सांगतेय, जीव लावणाऱ्या बहिणीची साथ

By भाग्यश्री कांबळे | Published: August 30, 2023 9:55 AM

Titeeksha Tawde writes an adorable message for sister Khushboo Tawde, on the Occasion of Raksha Bandhan राखी पौर्णिमा स्पेशल : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि तिची बहीण खुशबू या दोघींच्या प्रेमळ नात्याची खास गोष्ट

भाग्यश्री कांबळे

राखी पौर्णिमा. बहिण भावाला राखी बांधते. बहिण - भावाचे नाते साजरे करणाऱ्या या सणाला खूप महत्व आहे. 'वेड्या बहिणीची ही वेडी माया', 'भय्या मेरे राखी के बंधन को निभाना', 'फूलों का तारों का, सबका कहना है, एक हज़ारों में मेरी बहना है' ही प्रत्येक गाणी आपल्याला नक्की आठवतात. मात्र कुटुंबात बहीण भाऊ नसतील पण बहिणी असतील दोघी तरी हा सण तितकाच खास असतो. मायेचं नातं प्रेमानं साजरं होतं. लोकमत सखीशी गप्पा मारताना अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिचे आणि बहिणीचे मायेचे बंध उलगडून सांगितले(Titeeksha Tawde writes an adorable message for sister Khushboo Tawde on the Occasion of Raksha Bandhan).

तितिक्षा सांगते..

कशी साजरी करता तुम्ही राखी पौर्णिमा

आम्ही लहान होतो तेव्हा या सणानिमित्त खूप मोठं गेट - टुगेदर व्हायचं. मला सख्खा भाऊ नाही. पण ३ काका आणि ४ आत्या आहेत. त्यांच्या मुलांना आम्ही राखी बांधायचो. नंतर करिअर घडवण्यासाठी आम्ही सिनेसृष्टीत आलो. आता क्वचितचं आम्ही एकत्र मिळून हा सण साजरा करतो. पण मी माझ्या बहिणीला न चुकता राखी बांधते. लहानपणी आई - वडील शॉपवर जायचे. तर ती दिवसभर माझा सांभाळ करायची.

डोळ्यावर झापडं लावून लग्नाचा निर्णय घेताय की रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग दिसतात तुम्हाला?

कसं आहे तुमचं एकमेकींशी नातं..

आम्ही एकमेकींच्या फार जवळ आहोत. माझ्यापेक्षा माझी बहिण ३ वर्षांनी मोठी आहे. खूप लहानपणापासून माझी जबाबदारी तिच्यावर होती. माझ्यासाठी खुशबू म्हणजे माझी दुसरी आईच. शाळा असो किंवा पर्सनल लाईफ, तिने प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली आहे. प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलं आहे. सगळ्या प्रॉब्लेम्स सोडवले आहेत.

लग्नासाठी जोडीदार निवडताना ३ गोष्टी तपासून पाहा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर देतात तरुण मुलांना सल्ला

कसं बदललं हे नातं मोठं होता होता..

भावाने - बहिणीची रक्षा करावी, म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. पण भाऊच बहिणीचे रक्षण करू शकतो असे नाही. बहिणदेखील बहिणीचे रक्षण करण्यास तितकीच सक्षम असते. माझी बहिण माझ्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे मला असे वाटते, हा सण फक्त बहिण - भावापुरताच मर्यादित राहिलेला नसून, बहिणींमध्ये देखील साजरा होत आहे.

बॉयफ्रेण्ड तुमच्याशी सतत खोटं बोलतोय हे कसं ओळखाल? ३ गोष्टी- तुमची फसवणूक तर होत नाही..

मी सतत खुशबूला काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असते. माझ्या बहिणीची आता नवीन मालिका सुरु झाली आहे. तिला उपयोगी पडेल अशा भेटवस्तू मी देण्याचा प्रयत्न करते. तिचा वाढदिवसही जवळ येत आहे. त्यामुळे तिला शुटींग रिलेटेड किंवा मेकअपची वस्तू देईन असं ठरवतेय.

टॅग्स :रक्षाबंधनरिलेशनशिपरिलेशनशिप