जेनिफर विंगेट म्हणजे टेलिव्हीजन जगतातलं प्रसिद्ध नाव. सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या ज्या टीव्ही अभिनेत्री आहेत, त्यांच्यापैकीच एक आहे अभिनेत्री जेनिफर विंगेट. वेगवेगळ्या मालिकांमधून तर तिने काम केलंच आहे, पण त्यासोबतच अनेक कार्यक्रमांची होस्ट म्हणूनही ती प्रसिद्ध आहे.. कुढत- कुढत जगण्यापेक्षा वेळीच स्वत:ला आणि समोरच्या व्यक्तीला ओळखा आणि तिथेच थांबा, असं स्पष्टपणे ती सांगतेय. स्त्री असो किंवा पुरुष असो, कुणासाठी किती बदलायचं हे वेळीच ठरवून घ्या, असा मोलाचा सल्लाही तिने दिला आहे. बघा याविषयी नेमकं तिला काय सांगायचं आहे... (Tv actress Jennifer Winget explains about her relationship and life funda)
जेनिफरच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये जेनिफर म्हणते की कोणतीही गोष्ट असो तसेच स्त्री असो किंवा पुरुष असो... त्याच्याकडे ''बस्सं... माझ्याकडून हे एवढंच होऊ शकतं, यापेक्षा जास्त नाही'', असं समोरच्या व्यक्तीला ठणकावून सांगण्याचं कसब असायलाच हवं.
ट्रॅडिशनल लूक देणारी स्टायलिश बुगडी घ्यायची? बघा लेटेस्ट फॅशनच्या ८ सुपरवॉव बुगडी डिझाईन्स...
बहुतांश स्त्रिया समोरच्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी स्वत:ला खूप बदलतात. पण असं का करायचं... समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वत:ला बदलू नका आणि तुमच्यासाठी समोरच्या व्यक्तीलाही बदलायला भाग पाडू नका. तुम्ही जसे आहात, तसे एकमेकांसोबत राहू शकलात तर ठिक. नाहीतर मात्र तिथेच थांबा, असा थेट विचारही तिने मांडला आहे.
जेनिफर विंगेट म्हणजे अभिनेता करणसिंह ग्रोव्हर याची पत्नी. त्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर करणने अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केलं. जेनिफर म्हणते मी 'कट- ऑफ' करून टाकायला शिकले आहे.
नॉनस्टिक तव्याचे कोपरे खूप चिकट- तेलकट झाले? १ सोपा उपाय- न घासता तवा होईल चकाचक
नातं असो की अन्य कोणतीही बाब असो मी खूप पटकन कट- ऑफ करू शकते. मग मला लोकांनी हार्टलेस किंवा कोल्ड म्हटलं तरी चालेल. पण मला जर एखादी बाब पटली नाही, तर मी ते स्पष्टपणे सांगते आणि तिथेच थांबते. तिचा हा सल्ला थोड्याफार प्रमाणात जरी प्रत्येकीने आमलात आणला तरी आसपासचं वातावरण स्त्रियांच्या दृष्टीने अधिक सकारात्मक होऊ शकतं...