सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं आपल्या स्पष्ट मतांमुळे नेहमीच चर्चेत असते. महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दल तिनं अलिकडेच ब्लॉग लिहिला आहे. ती स्वत: कोण आहे आणि त्यांनी आयुष्यात स्वतंत्रपणे काय मिळवले आहे याची पर्वा न करता तिनं आपलं मत रोखठोकपणे मांडलं आहे. अक्षय आणि ट्विंकलला आरव आणि नितारा अशी २ मुलं आहेत.
ट्विंकलने कबूल केले आहे की तिची आणि अक्षय कुमारची अनेक विषयांवर परस्परविरोधी मते आहेत आणि तिने तिच्या टाईम्स ऑफ इंडिया ब्लॉगमध्ये लिहिले आहे, "जर मी माझ्या पद्धतीने मांडलेल्या विचारांवर लक्ष दिले तर एकतर मला घटस्फोट घ्यावा कारण माझा जोडीदार आणि मी अनेक मुद्द्यांवर विरोधी विचार ठेवतो किंवा लग्न टिकवून ठेवण्यासाठी पण विकेंडला मात्र साडी नेसून आणि टिप टिप बरसा पानीचा आनंद घेतो.”
मलाला युसुफझाईने अलीकडेच लग्न संस्थेवर विश्वास नसल्याचा अर्थ सांगून काही महिन्यांनी लग्न केल्याची घोषणा केल्यानंतर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियांबद्दल भाष्य करताना ट्विंकल पुढे म्हणाली, अशा महिला तुमच्या आयकॉन असतील तर काही फरक पडत नाही. इंस्टाग्रामवर तुमच्या फॅमिलीतील फॉलोअर्सपैकी 22 सदस्य फक्त तुम्हाला जज करतील.
ती पुढे म्हणाली, “तुम्ही अविवाहित असाल तर लग्न करायला हवं होतं, लग्न झालं, मग मुलं कुठे आहेत? कामाला जाणाऱ्या महिलांनो, मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? जर तुम्ही काम करत नसाल तर तुम्ही त्याच वाईट उदाहरण मांडत आहात. तुम्ही तुमच्या पतीशी सहमत आहात का? नसाल तर तुम्हाला पाय पूसणी समजलं जातं. आणि जर तुम्ही असहमत असाल तर तुम्ही अजूनही त्याच्यासोबत का आहात? असं म्हणत नेहमीच बायकांना दोष दिला जातो. कपाळावरच्या त्या रेषा तुम्हाला दादी अम्मा सारख्या दिसतात! तुम्ही सुरकुत्या लपण्यासाठी बोटॉक्स वापरत आहात का? हे किती कृत्रिम खोटंय.'' या माध्यमातून महिलांच्या रोजच्या जगण्यातील गोष्टी आणि लोकांच्या मानसिकतेवर ट्विंकलनं प्रश्न उपस्थित केला आहे.
ट्विंकल ही अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. 90 च्या दशकात तिची एक अभिनेत्री म्हणून नावाजली गेली. पण ती टिकवून ठेवण्यासाठी तिच्याकडे आवश्यक कौशल्ये नाहीत हे मान्य करणारी ती पहिली आहे. दुसरीकडे अक्षयला भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्थान दिले जाते. सूर्यवंशी या अॅक्शनपटात तो शेवटचा दिसला होता.