Lokmat Sakhi >Relationship > सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय

सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय

Vaginal Health Tips : स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गरिमा श्रीवास्तव यांनी यासंदर्भातील अधिक माहिती  दिली आहे. (Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 01:50 PM2023-06-16T13:50:12+5:302023-06-16T14:43:24+5:30

Vaginal Health Tips : स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गरिमा श्रीवास्तव यांनी यासंदर्भातील अधिक माहिती  दिली आहे. (Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy)

Vaginal Health Tips : Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy by experts | सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय

सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय

सेक्शुअल प्लेजर प्रत्येकासाठी गरजेचा असतो. फक्त प्रजननासाठीच नाही तर शारीरिक समाधानासाठीही दोघांमध्ये चांगले रिलेशन्स असणं  गरजेचं असतं. फिजिकल रिलेशन्स ठेवताना समस्या जाणवणं हे कोणत्याही वयोगटातील सामान्य प्रोब्लेम आहे. (Vaginal Health Tips) वेळीच स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकतात, यामुळे डिस्कंफर्ट वाढतो.  डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच योग्य उपाय केल्यास समस्या टाळता येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गरिमा श्रीवास्तव यांनी इंस्टाग्राामवर यासंदर्भातील अधिक माहिती  दिली आहे. (Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy)

व्हजायनल बर्निंग का होते?

फिजिकल रिलेशन्सनंतर व्हजायलन इचिंगची समस्या जाणवत असेल याकडे एक आजार म्हणून पाहिलं जातं. वैद्यकिय परिभाषेत याचा डिस्पर्युनिया (dyspareunia)  असं म्हणतात. फिजिकल एक्सपिरिएंसच्या कमतरतेमुळे हे जाणवतं. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. पुरूषांच्या तुलेत जास्तीत जास्त महिलांना हा आजार जाणवतो. मेनोपॉज आणि पोस्ट पार्टम पिरीएडदरम्यान ही समस्या उद्भवते. 

१) व्हजायनल ड्रायनेस कमी कसा करायचा

जर व्हजायनात योग्य ल्यूब्रिकेशन्स झाले नाहीत तर सेक्शुअल रिलेशन्स नेहमी वेदनादायक ठरू शकतात. काही महिलांची व्हजायना ही नैसर्गिकरित्या कोरडी असते. औषधांचा ओव्हरडोस, ताण-तणाव यांसारख्या गंभीर स्थितीमुळे ही समस्या वाढत जाते.  अशावेळी ल्यूब्रिकंट्सचा वापर तुम्ही करू शकता

२) इन्फेक्शन

व्हजायनल संसर्गामुळे जळजळ आणि वेदना होऊ शकतात. युटीआय, यीस्ट संसर्ग सर्वात सामान्य आहेत. काही प्रकरणांमध्ये, ऍलर्जी किंवा त्वचेची जळजळ देखील याचे कारण असू शकते. हे कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. 

३) रफ सेक्शुअल एक्सपिरिएंस

काही प्रकरणांमध्ये जर लैगिंक अनुभव खूपच त्रासदायक असेल किंवा तुम्ही जोडीदाराची काळजी घेत नसाल तर चिडचिड आणि अस्वस्थता येऊ शकते.  सुरक्षिततेसाठी ल्युब्रिकंट्सचा वापर करा.

४) कंडोम्सची एलर्जी

काहीवेळा कंडोमचा ब्रँड बदलल्यानं समस्या येऊ शकतात. अशावेळी डॉक्टराचां सल्ला घ्या.  गंभीर स्थितीत तुम्ही कंडोमऐवजी दुसरे गर्भनिरोधक वापरू शकता. व्हजायनचा ड्रायनेस जास्त वाढला असेल किंवा फिजिकल रिलेशन्स नंतर ब्लिडींग होत असेल किंवा फिजिकल रिलेशन्सनंतर जळजळ होत असेल. किंवा व्हजायनात खाजेची समस्या वाढली असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Vaginal Health Tips : Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.