Lokmat Sakhi >Relationship > व्हॅलेंटाइनला जोडीदाराला काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय? ५ हटके पर्याय, जोडीदार होईल एकदम खूश...

व्हॅलेंटाइनला जोडीदाराला काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय? ५ हटके पर्याय, जोडीदार होईल एकदम खूश...

Valentine Day 2023 Gift Ideas : आपल्या जोडीदाराचा दिवस करा स्पेशल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 02:33 PM2023-02-12T14:33:28+5:302023-02-12T14:35:04+5:30

Valentine Day 2023 Gift Ideas : आपल्या जोडीदाराचा दिवस करा स्पेशल...

Valentine Day 2023 Gift Ideas : Wondering what to get your partner for Valentine's Day? 5 hot options, partner will be very happy... | व्हॅलेंटाइनला जोडीदाराला काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय? ५ हटके पर्याय, जोडीदार होईल एकदम खूश...

व्हॅलेंटाइनला जोडीदाराला काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय? ५ हटके पर्याय, जोडीदार होईल एकदम खूश...

व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस. पाश्चात्य संकल्पना म्हणून याबाबत मतमतांतरे असली तरी आपल्या मनातील भावना आपल्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याचे हे एक उत्तम निमित्त असते. आपल्या नात्याचा ओलावा टिकून राहावा, नातं बहरावं आणि प्रेम व्यक्त करण्याची एक संधी म्हणून या दिवसाचे खास महत्त्व आहे. तरुण मुलामुलींबरोबरच लग्न झालेल्या जोडप्यांमध्येही जगभरात अतिशय उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. आपलं ज्याच्यावर जीवापाड प्रेम आहे अशा व्यक्तीला भेट देऊन खूश करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण या खास दिवसासाठी या व्यक्तीला काय द्यावं हे मात्र आपल्याला अनेकदा सुचत नाही. म्हणूनच आज आपण असेच काही खास पर्याय पाहणार आहोत जे दिल्याने आपला जोडीदार नक्कीच खूश होईल आणि त्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्यालाही समाधान वाटेल (Valentine Day 2023 Gift Options For Partner). 

वॉलेट किंवा पर्स 

ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला सतत लागते. यामध्येही अगदी स्वस्तात म्हणजे २०० ते ३०० रुपयांपासून ते ब्रँडेड असे बरेच पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरची आवड लक्षात घेऊन असे एखादे छानसे वॉलेट किंवा मुलींसाठी स्लिंग पर्स, हँडबॅग नक्की खरेदी करु शकता. ही गोष्ट सतत आपल्यासोबत असल्याने त्या व्यक्तीची आठवण आपल्यासोबत राहते. 

(Image : Google)
(Image : Google)

पिलो 

हल्ली स्मायली, हार्ट शेप अशा वेगवेगळ्या आकारातल्या पिलो मिळतात. आपण सोबत राहत नसू तर आपली आठवण म्हणून जवळ घेऊन झोपण्यासाठी अशी एखादी पिलो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी नक्कीच घेऊ शकतो. 

कस्टमाइज गिफ्ट

सध्या कस्टमाइज्ड गिफ्टची खूप फॅशन असल्याचे पाहायला मिळते. मग यावर त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा फोटो किंवा त्यांचे नाव आपल्याला घेता येऊ शकते. कुशन, कुशन कव्हर्स, कॉफी मग, फोटो फ्रेम, घड्याळ, बेडशीट्स, टीशर्ट्स, स्लीप वेअर सेट्स असे बरेच पर्याय उपलब्ध असतात. फक्त हे गिफ्ट द्यायचं असल्यास थोडा आधीपासून विचार करून त्या गोष्टी बनवून घ्यावा लागतील एवढंच.   

गिफ्ट कार्ड

अनेकदा आपल्या जोडीदाराला काय घेतलेलं आवडेल याचा आपल्याला अंदाज नसतो. पण आपल्याला काहीतरी गिफ्ट तर द्यायचंच असतं. अशावेळी मॉल किंवा मोठमोठे ब्रँड आपली गिफ्ट कार्ड विक्रीसाठी ठेवतात. त्यामुळे विशिष्ट वस्तू खरेदी न करता गिफ्ट कार्ड खरेदी करण्याचा पर्याय उत्तम असू शकतो. आपल्या आवडीनुसार तो व्यक्ती खरेदी करु शकतो. तसेच या कार्डची व्हॅलिडीटी साधारणपणे वर्षभराची असते. त्यामुळे वर्षभरात लागेल तेव्हा कधीही खरेदी करता येऊ शकते.

(Image : Google)
(Image : Google)

पार्लर व्हाऊचर

केवळ मुलींनाच नटायला आवडते असे नाही. तर आपली स्कीन, दाढी, केस यांबाबत मुलंही खूप पझेसिव्ह असतात. हल्ली मुलांनाही पार्लरमध्ये कित्येक तास घालवायला आवडते. यामध्ये केवळ दाढी-कटींग नसते तर हेड मसाज, फेस मसाज यांसारख्या कित्येक गोष्टी मुलं आवडीनं करुन घेतात. चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी आणि कामाचा थकवा, शीण घालवण्यासाठी हे पार्लरींग केले जाते. अशाच एखाद्या पार्लरचे व्हाऊचर तुम्ही आपल्या पार्टनरला देऊ शकता. 

Web Title: Valentine Day 2023 Gift Ideas : Wondering what to get your partner for Valentine's Day? 5 hot options, partner will be very happy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.