Lokmat Sakhi >Relationship > Valentine’s Day 2023 : ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे!- प्रेमात पडलात, पण निभवायची तयारी आहे का?

Valentine’s Day 2023 : ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे!- प्रेमात पडलात, पण निभवायची तयारी आहे का?

Valentines Day Special : प्रेमात पडणं सोपं, पण प्रेम टिकवणं आणि समंजस प्रेम करणं वाटतं तितकं सोपं नसतं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 06:02 PM2023-02-10T18:02:32+5:302023-02-10T18:19:13+5:30

Valentines Day Special : प्रेमात पडणं सोपं, पण प्रेम टिकवणं आणि समंजस प्रेम करणं वाटतं तितकं सोपं नसतं कारण..

Valentine's Day 2023 : Happy Valentine's Day Falling in love, but ready to commit? | Valentine’s Day 2023 : ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे!- प्रेमात पडलात, पण निभवायची तयारी आहे का?

Valentine’s Day 2023 : ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे!- प्रेमात पडलात, पण निभवायची तयारी आहे का?

भाग्यश्री ढोबळेपाटील-खैरे

फेब्रुवारी महिना आला की सगळीकडे प्रेमाचे वारे वाहायला लागतात. पाश्चात्यांची संकल्पना म्हणून काही जण या दिवसाला विशेष महत्त्व देत नसले तरी या निमित्तनाने आपण हक्काने आणि भांडून आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला काय हरकत आहे. प्रेम ही गुलाबी, अलवार आणि सुखाची संकल्पना असली तरी त्याला बरेच कंगोरे आहेत. आजकालच्या मुला मुलींमध्ये " कमिटेड " असण्याचा एक ट्रेंड आहे. प्रेमाची व्याख्या खूप साधी आणि सरळ आहे " स्वभावाच्या प्रेमात पडणे हेच प्रेम " होय. कारण रंग, रुप, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी भविष्यात टिकतील असं नसत पण व्यक्तीचा स्वभाव मात्र कायम टिकतो. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा हाच स्वभाव समजण्यासाठी एकमेकांबरोबर बराच वेळ घालवावा लागतो (Valentine’s Day 2023). 

आपण आपल्या आजुबाजूला अशी अनेक जोडपी बघतो, जे एकमेकांसाठी एकदम पूरक आहेत असे आपल्याला पाहता क्षणी वाटून जाते. मात्र त्यामागे त्यांनी एकमेकांसाठी केलेल्या चांगल्या- वाईट गोष्टी, त्याग हे आपल्याला माहित नसते. आकर्षण हे कधीच प्रेम नसते ते फक्त इम्प्रेशन असते. हल्लीचे तरुण बहुतांश वेळा प्रेमापेक्षा आकर्षणाला बळी पडताना दिसतात. तुम्हाला खरंच तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवायचा आहे की त्याची जाहिरात करायची आहे हा सध्याच्या पिढीपुढचा एक मुख्य प्रश्न आहे. जवळची व्यक्ती सोशल मिडीयामुळे लांब गेली आणि ऑनलाईन असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातले पाणी खरे वाटू लागते. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअॅप यावर अपडेट राहण्याच्या नादात आपले वैयक्तिक आयुष्य कधी जगजाहीर व्हायला लागले ते आपले आपल्यालाही समजले नाही.

(Image : Google)
(Image : Google)

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाच्या दिवसाचं हेच महत्व आहे की आपल्याला जीव लावणाऱ्या माणसांना वेळ द्या आणि आपले नाते अजून घट्ट बनवा. यासाठी संवाद हेच चांगले माध्यम असू शकते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलेलं नसेल, तर ते करण्याची ही उत्तम संधी आहे हे लक्षात घ्या. खालील काही मुद्दे लक्षात घेतले तर आपल्या लव्ह लाइफ मध्ये गोंधळ न होता सगळे सुरळीतपणे होईल.

१. नात्यात प्रामाणिक राहा, समोरच्याचा विश्वासघात  करू नका .

२. कटू प्रसंगात एकमेकांची साथ द्यायला मागे-पुढे पाहू नका.  

३. आपल्या जोडीदारासपासून  काहीही म्हणजे अगदी काहीही लपवू नका त्याचे परिणाम विपरीत होतील .

(Image : Google)
(Image : Google)

४. अनेकदा आपण घाई गडबडीत असताना मेसेजवर बोलतो. पण त्यापेक्षा थेट कॉलवर किंवा भेटून एकमेकांच्या संपर्कात राहा. यामुळे खूप  गैरसमज कमी होतील आणि वाद टळतील. 

५. समोरच्याच्या आवडी-निवडीचा आदर करा आणि त्या जपण्याचा प्रयत्न करा. 

६. नाते सिरीयस असेल तर जोडीदाराची घरच्यांशी भेट घालून द्या , यामुळे नात्यात सिरिअसपणा तर येतोच पण घरच्यांनाही कल्पना असल्याने तेही निश्चिंत राहतात. 

७. जोडीदाराशी प्रेमळ संवाद गरजेचा आहे, मृदू भाषेत आपले म्हणणे पटवून सांगा, त्यामुळे वाद टळतील आणि नाते अधिकाधिक प्रगल्भ होईल.

८. प्रेमात असताना आणि नसताना सुद्धा शिक्षण, करिअर या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. 

Web Title: Valentine's Day 2023 : Happy Valentine's Day Falling in love, but ready to commit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.