काही म्हणा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याची जी मजा बॅचलर असताना येते ना, ती काही लग्न झाल्यानंतर नसते.. आणि त्यातही जेव्हा तुमचं प्रेम अगदीच नवं- नवं असतं, तेव्हा तर या दिवसाची एक्साईटमेंट खूप जास्त वाढलेली असते.. एकतर तुम्ही कुणावर तरी प्रेम करत असता, पण तुमचं प्रेम जगासमोर आणण्याची किंवा कबूल करण्याची हिंमत तुमच्यात आलेली नसते. असं असताना चोरून- लपून व्हॅलेंटाईन्स (married couple's valentines) साजरा करण्यात जी धमाल आणि जे थ्रील असतं, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही...
लग्न झालेल्या मंडळींचं मात्र तसं काही नसतं.. सगळ्याच गोष्टींचे अधिकार मिळाल्याने चोरून- लपून असं काही त्यांच्याकडे नसतं.. एकतर दोघेही सोबतच असतात, दुसरं म्हणजे या ना त्या कारणाने नेहमीच डिनर- लंच होत असतं, लग्नाचे वाढदिवस किंव सणवार या निमित्ताने नेहमीच एकमेकांना गिफ्ट देणं होतं. त्यामुळे मग रोजच व्हॅलेंटाईन्स असल्यासारखा असतो. त्यामुळे य दिवसाची एक्साईटमेंट लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये फार काही दिसून येत नाही..
त्यात जर एकाला व्हॅलेंटाईन्स साजरा करण्याची जबरदस्त इच्छा असेल आणि दुसरा मात्र त्याबाबत निरस असेल तर तशा जोडप्याची यादिवसाची वेगळीच कथा असते.. या मध्ये बऱ्याचदा पत्नीलाच असं वाटत असतं की नवऱ्याने यादिवशी आपल्याना काहीतरी सरप्राईज द्यावं, एखादं गुलाबाचं फुलं द्यावं, रात्री डिनरला जाऊ असं म्हणावं...
photo credit- google
पण नवरोबाला त्यात काहीच स्वारस्य नसतं आणि तो बिचारा नेहमीप्रमाणे त्याचं रुटीन फॉलो करत असतो. अशा वेळी मग बायकांचा संताप होतो आणि बाहेरच्या जगात जरी प्रेमाची हवा बरसत असली तरी अनेक घरी मात्र संतापाची, रागाची लाट आलेली असते..
लग्न झालेल्या जोडप्यांचा व्हॅलेंटाईन्स डे कसा साजरा झाला, याचे असेच काही मिम्स सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून अनेक मैत्रिणींना हे मिम्स म्हणजे जणू काही आपलीच कहानी आहे की काय असे वाटत आहे.