Join us  

Valentine's special: नवरा- बायकोचाही होऊ शकतो व्हॅलेंटाईन्स डे खास, ४ स्पेशल गोष्टीनी नात्यात भरा रोमान्सचे रंग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 7:42 PM

Valentines celebration for married couple: लग्न होऊन ५- १० वर्षे झाली, म्हणून काय झालं.. तुमचाही व्हॅलेंटाईन्स होऊ शकतो की खास.. नात्यामध्ये पुन्हा नवे रंग भरण्यासाठी आणि नातं रिफ्रेश करण्यासाठी (refreshment for your relation) यासारखा दुसरा चांगला चान्स नाही..

ठळक मुद्देतुमच्या नात्याला एक नवा रिफ्रेशिंग मोड देण्याचा हा जबरदस्त चान्स मिस करू नका.. नवऱ्याला किंवा बायकोला या दिवशी खुश कसं करायचं, यासाठी या घ्या काही खास टिप्स.. 

व्हॅलेंटाईन्सचा डे (valentines day) चा गुलाबी रंग आता हळूहळू सर्वत्र पसरत चालला आहे.. आपल्या निअर आणि डिअर वन ला कसं खुश करायचं, याचं भरपूर प्लॅनिंग, सरप्राईजची तयारी सुरू आहे.. आता व्हॅलेंटाईन्स म्हणजे प्रेमाचा दिवस. हा दिवस फक्त कॉलेजमधल्या तरूण- तरूणींसाठीच असतो, आम्हाला काय त्याचं.. आमच्या लग्नाला झाली की आता ५- १० वर्षे.. असा पोक्त विचार करून या दिवसाचा आनंद आणि एक्साईटमेंट घालवू नका... तुमच्या नात्याला एक नवा रिफ्रेशिंग मोड देण्याचा हा जबरदस्त चान्स मिस करू नका.. नवऱ्याला किंवा बायकोला या दिवशी खुश कसं करायचं, यासाठी या घ्या काही खास टिप्स.. 

 

१. एक फुल आणि आय लव्ह यू..बस्स... एवढंच केलं तरी तुम्हारा दिन बन जायेगा यार.. हो खरंच आहे हे.. कारण लग्नाला ५- १० वर्षे झाली असतील, तर त्यानंतर मिळणाऱ्या एका फुलाचा आणि आय लव्ह यू चा आनंद काही वेगळाच असतो.. त्यामुळे अगदी सकाळी उठल्या- उठल्या तुमच्या पार्टनरला असं मस्त रोमॅण्टीकली ग्रीट करा..

 

२. केक कटिंग...व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी किंवा बायकोसाठी एखादा सरप्राईज केक प्लॅन करू शकलात, तर नक्कीच तुमच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी मजा येईल.. त्यामुळे व्हॅलेंटाईन्सनिमित्त एखादा केक तर पाहिजेच.. त्याशिवाय सेलिब्रेशन पुर्ण कसं होणार..

 

३. सरप्राईज गिफ्ट..माणसाचं वय कितीही झालं तरी त्याला सरप्राईज गिफ्ट हमखास आवडतंच आवडतं.. त्यामुळे या दिवशी तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला नक्कीच एखादं सरप्राईज गिफ्ट द्या. अर्थात गिफ्ट महागडंच असावं, असं मुळीच नाही. पण गिफ्टची निवड अशी करा, की ती वस्तू तुमच्या पार्टनरला खूप दिवसांपासून पाहिजे आहे.. त्यामुळे आतापासूनच आपल्या पार्टनरला नेमकं काय पाहिजे आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करा.

 

४. कौतूक करायला विसरू नका..ही आणखी एक गोष्ट असते, जी कोणत्याही वयात प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.. या दिवसाचं मुहूर्त साधून तुमच्या जोडीदाराचं कौतूक नक्की करा.. तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात आल्याने आयुष्य कसं चांगलं झालं किंवा काय चांगले बदल झाले.. तुम्ही दोघंही एकमेकांसाठी कसे परफेक्ट आहात हे सगळं या दिवशी बोला.. एरवी आपण भावना व्यक्त करत नाही. समोरच्याचं कौतूक, प्रेम सगळं मनात ठेवतो. पण यादिवशी मात्र हे सगळं न चुकता तुमच्या जोडीदाराला सांगा. तो नक्कीच खुष होणार..

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीक