Lokmat Sakhi >Relationship > Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Propose day 2022: ज्याला प्रपोज करताय त्याच्याकडून कन्फर्म होकार मिळवायचा असेल आणि यंदाच्या व्हॅलेंटाईन्सला (valentines day) सिंगल रहायचं नसेल, तर प्रपोज करताना हे काही नियम पाळाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 01:30 PM2022-02-08T13:30:09+5:302022-02-08T13:31:31+5:30

Propose day 2022: ज्याला प्रपोज करताय त्याच्याकडून कन्फर्म होकार मिळवायचा असेल आणि यंदाच्या व्हॅलेंटाईन्सला (valentines day) सिंगल रहायचं नसेल, तर प्रपोज करताना हे काही नियम पाळाच..

Valentines week, Propose day 2022: 5 Do's & Don'ts to keep in mind while proposing. | Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Highlightsप्रपोज करताना या चुका कराल, तर पुन्हा सिंगलच रहाल..

कुणीतरी आवडलेलं असतंच, फक्त त्याला किंवा तिला प्रपोज करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली जाते. आता प्रपोज करण्यासाठी व्हॅलेंटाईन्स वीकशिवाय (valentines week) दुसरा कोणता चांगला मुहूर्त असणार? शिवाय आणखी किती वर्षे एकट्यानेच व्हॅलेटाईन्स साजरा करणार?  म्हणूनच तर करा मनाचा हिय्या आणि करून टाका आवडत्या व्यक्तीला थेट प्रपोज (propose day 2022)... त्या व्यक्तीकडून हमखास होकार मिळवायचा असेल तर मात्र प्रपोज करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे मात्र पक्क माहिती करून घ्या (Proposal Do's and Don'ts)..

 

प्रपोज करताना या ५ गोष्टी नक्की करा 
१. मुलगा असो की मुलगी प्रपोज डे च्या दिवशी एखाद्या कडून प्रपोजल येणं अनेक जणांना भारीच आवडतं.. त्यामुळे या दिवशी तुम्हाला ज्याला प्रपोज करायचं आहे त्याला किंवा त्याला काही तरी छान सरप्राईज द्या.. रोमॅण्टीक, हळूवार पद्धतीने केलं जाणारं प्रपोज कोणलाही आवडतं...

२.ज्याला प्रपोज करणार आहात त्याला काय आवडतं, याची थोडी माहिती आधी घेऊन ठेवा.. त्यानुसार प्रपोज कधी, कसं आणि कुठे करायचं हे ठरवा..

३. हा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.. त्यामुळे यादिवशी तुम्ही छान, प्रेझेंटेबल, स्टायलिश आणि आकर्षक दिसणं गरजेचं आहे.. त्यामुळे थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि तुमच्या आयुष्यातल्या या खास प्रसंगी मस्त तयार व्हा...

 

४. प्रपोज करताना न अडखळता स्पष्टपणे बोला... रोमॅण्टीक पद्धतीने, समोरच्याचा अंदाज पाहून, ओळखून बोला.. तुम्ही प्रपोज करण्याविषयी आणि समोरच्या व्यक्तीविषयी किती सिरिअस आहात, हे तुमच्या बोलण्यातून- कृतीतून जाणवू द्या..

५. अंगठी देऊन प्रपोज करणार असाल तर ती पण अतिशय रोमॅण्टीक पद्धतीने द्या. अलगदपणे समोरच्याच्या पुढ्यात आणून ठेवा किंवा मग ती छान डेकोरेट करून  किंवा एखाद्या आकर्षक डबीत आणा..

 

प्रपोज करताना या चुका कराल, तर पुन्हा सिंगलच रहाल..
१. साधं थेट सरळ- सरळ प्रपोज करणार असाल तर ते समोरच्या व्यक्तीला फारसं काही पचत, आवडत नाही.. त्यामुळे थेट आय लव्ह यू म्हणून मोकळे होऊ नका.. 

२. ज्याला प्रपोज करणार आहात, त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतल्याशिवाय, त्याच्या आवडीनिवडी जाणून घेतल्याशिवाय प्रपोज करू नका. कारण असं करताना तुम्ही उत्साहाच्या, प्रेमाच्या भरात काही करायला गेलात आणि समोरच्याला ते आवडलं नाही, तर जाम वांधे होऊ शकतात. 

३. तुमच्या दिसण्यावर, कपड्यांवर नक्कीच लक्ष द्या.. पण त्यात कुठेही फिल्मीपणा येऊ देऊ नका.. कारण असा फिल्मीपणा अनेक जणांना आवडत नाही..

 

४. रोमॅण्टीक, भावनिक होऊन जरूर बोला, पण त्यात कुठेही ड्रामेबाजी किंवा ओव्हरॲक्टींग नको.. बऱ्याचदा समाेरच्या व्यक्तीला अशी ओव्हरॲक्टिंग आवडत नाही.. यातून तुम्ही शो ऑफ करताय किंवा मग खूपच नाटकी आहात, असा अर्थ समोरची व्यक्ती घेऊ शकते. 

५. खाद्य पदार्थात अंगठी टाकणे, वेटरच्या हाताने अंगठी मागवणे टाळा.. ती अंगठी एवढीही लपूवन ठेवू नका, की ती शोधताना समोरच्या व्यक्तीची आणि तुमची दोघांचीही तारांबळ होईल..
 

Web Title: Valentines week, Propose day 2022: 5 Do's & Don'ts to keep in mind while proposing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.