सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. आपले नातेवाईक अथवा मित्रमंडळींमध्ये कोणाचं न कोणाचं तरी लग्न झालंच असेल. आजकालचे लग्न हे जणू एका सोहळ्याप्रमाणेच साजरा करण्यात येत आहे. मात्र, वधू आणि वराच्या मनामध्ये एक वेगळीच घालमेल सुरु असते. कारण लग्नानंतर पुढचं संपूर्ण आयुष्य हे त्यांना एकमेकांसोबत घालवावे लागते. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावत असते. अशा परीस्थित मनावर आणि विचारांवर कंट्रोल ठेवणे अवघड होऊन जाते. जर आपले देखील यंदा कर्तव्य होत असेल आणि मनामध्ये पुढील भविष्याच्या विचाराने हुरहूर वाटत असेल, तर काही टिप्स फॉलो करा. याने आपण सकारात्मक विचाराने पुढे जाल आणि चांगले विचार करायला सुरुवात कराल.
प्री वेडिंग इंजाईटीला करा असे दूर
पार्टनरसह बातचीत महत्वाची
जर आपण लग्नाच्या तयारीबाबत किंवा लग्नानंतरच्या आयुष्याबाबत खूप तणावाखाली येऊन विचार करत असाल तर, तुमच्या जोडीदाराला तुमची मानसिक स्थिती सांगणे केव्हाही उत्तम. कदाचित मानसिक स्थिती शेअर केल्याने आपल्याला बरे वाटेल यासह मनातील ओझे कमी झाल्यासारखे वाटेल.
परिस्थितीचा स्वीकार करा
पुढील चिंतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करणे. आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: ला तयार केलं पाहिजे. याने चिंता दूर करण्याचे मार्ग देखील सापडतील. म्हणूनच आपण प्रथम आपली परिस्थिती स्वीकारणे महत्वाचे आहे.
विश्वासू मित्र - मैत्रिणींची घ्या मदत
आपण जर लग्नाला घाबरत असाल किंवा भविष्याबाबत विचार करून टेन्शनमध्ये येत असाल तर, आपल्या विश्वासू मित्रमैत्रिणीशी मनातील गोष्ट शेअर करा. यासाठी आपण विवाहित मित्रांची मदत घेतली तर उत्तम ठरेल. कारण त्यांना संसाराचा अनुभव आलेला असतो.
पार्टनरवर ठेवा विश्वास
नात्यात विश्वास असणे महत्वाचे आहे. कारण आपला पार्टनर पुढील संपूर्ण आयुष्यभर आपली काळजी आणि साथ देणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. अशावेळी तुमची मानसिक स्थिती त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला चांगले वाटेल. कारण पुढील संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे आहे.
परफेक्ट बनायला जाऊ नका
नेहमी लक्षात ठेवा की आपण कोणत्याही गोष्टीत परिपूर्ण होऊ शकत नाही. कोणत्याही घटनांमध्ये काही चुका होणारच. त्यामुळे स्वतःला व आपल्या पार्टनरला परफेक्ट बनवण्याचा अट्टाहास ठेऊ नका.