हनिमून (HoneyMoon) किंवा पहिली रात्र, सुहाग राग याचं फिल्मी चित्रण इतकं झालेलं आहे की अनेकदा बऱ्याच विचित्र, भ्रामक आणि अवास्तव कल्पना घेऊनच तरुण जोडपी या साऱ्याला सामोरे जातात. (Relationship Tips) अनेक तरुणींच्या मनात त्या रात्रीची अनामिक भीती असते तर तरुणांनी काहीबाही वाचून ऐकून हे ठरवलेलं असतं की त्या रात्री सेक्शुअल परफॉर्मन्स चांगलाच व्हायला हवा. चांगली कामगिरी करण्यासाठी पुरुष अकारण स्वत:वर फार ताण ओढावून घेतात. (What is the biggest mistake that new couples make?)
महिलांनाही त्यांच्या जोडीदारांकडून खूप अवास्तव अपेक्षा असतात. (What should we not do on first night?) इथेच अनेक चुका होतात, गैरसमज होतात आणि सुखी लैंगिक जीवनाची सुरुवातच होत नाही. लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांनी लोकमत सखीशी बोलताना पहिल्या रात्रीसंदर्भातील चुका आणि गैरसमज यांची माहिती दिली. (Mistakes To Avoid During Your Wedding Night )
पहिली रात्र, परीक्षा नव्हे..
लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात, 'अरेंज मॅरेज असेल किंवा आधी एकमेंकांचा सहवास घडला नसेल तर लग्नानंतर पहिल्याच रात्री किंवा हनीमूनला गेल्यावर लगेच आपण सेक्स करु अशी अपेक्षा ठेवू नया. संभोग पहिल्याच रात्री झाला पाहिजे, पहिल्या रात्री न झाल्यास पत्नी आपल्यावर नाराज होईल हा पुरुषांचा गैरसमज असतो. जसं आपण पहिल्याच दिवशी व्यवस्थित पोहू शकत नाही, व्यवस्थित सायकल चालवू शकत नाही. त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी संभोग जमेल असं काही नाही. नंतर सवयीनं तुम्ही खूप चांगल्याप्रकारे संभोग करू शकता.
कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना आपल्याकडून चुका होतात, व्यवस्थित जमत नाही. त्याप्रमाणे संभोगावेळी अशी स्थिती येऊ शकते. कारण संभोग करताना आपल्या विवस्त्र व्हावं लागतं याचीही अनेकांना सवय नसते, ते ही एका दुसऱ्या व्यक्तीसमोर,....इरेक्शन होईल की नाही, उत्तेजना येणं याबाबत दोघांच्याही मनात भिती असू शकते. त्यामुळे हा अनुभव आहे, आपल्या जोडीदाराशी बोला, पण परीक्षा आहे नाहीच जमलं तर संपलं सगळं असं मनात आणू नका.’
अपेक्षा मोकळेपणानं सांगा..
डॉ. भोसले सांगतात, आपल्याला पार्टनरकडून ज्या अपेक्षा असतात पण त्या कधी बोलून दाखवलेल्या नसतात. दोघंही एकमेकांशी मोकळेपणानं बोलत नाहीत. अनेकदा या अपेक्षा काल्पनीक असतात. त्यामुळे सुरुवातीला एकमेकांचा सहवास एन्जॉय करायला हवा. अनेकदा पुरूषांना असं वाटतं की आपल्याकडून पत्नीच्या अपेक्षा असतील. याउलट जोपर्यंत भावना, प्रेमसंबंध जुळेलेले नाहीयेत तोपर्यंत शारीरिक संबंधांची घाई तिला आवडत नसते,हे लक्षात ठेवावं. दोघांचे एकमेकांबद्दल भलतेच गैरसमज असतात.
म्हणून सुरूवातीला एकमेकांचे चांगले मित्र व्हा, मनमोकळेपणानं बोला. जवळीक, संभोग या सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू झाल्या तरी चालू शकतं. काहीवेळा पहिल्या संभोगाच्यावेळी महिलांना रक्तस्त्राव होतो करा कारण अवयवांना या गोष्टींची सवय नसते. त्यामुळे इन्फेक्शन, इरिटेशन होऊ शकतं. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी, डॉक्टरांच्या संपर्कात राहा, भरपूर पाणी प्या.'
लग्न आणि थकवा..
भारतात असा कोणताही विवाह नाही ज्यामध्ये काहीही वाईट घडत नाही. कधी नातेवाइकांचा राग येतो तर कधी जेवण, मानपान यांसारख्या गोष्टींची कमतरता भासते. कधीकधी लग्नाची व्यवस्था इतकी बिघडते की प्रत्येकाचा मूड खराब होतो. जर तुमच्या वैवाहिक जीवनातही असे काही घडले असेल आणि तुमचा मूडही खराब असेल तर तुमच्या बेडरूममध्ये जाण्यापूर्वी या सर्व गोष्टी बाहेर सोडा आणि पार्टनरसहच्या सहवासाचा आनंद घ्या. एकमेकांशी दोस्ती, सहवास आणि मग संबंध हे सुखी वैवाहिक जीवनाचं सूत्र आहे हे विसरु नका.