Lokmat Sakhi >Relationship > ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

Christmas Gifts for loved ones ख्रिसमस जवळ आला की सर्वत्र उत्साहाचा वातावरण दिसून येते. आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन खूश करू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 01:33 PM2022-12-12T13:33:38+5:302022-12-12T13:35:31+5:30

Christmas Gifts for loved ones ख्रिसमस जवळ आला की सर्वत्र उत्साहाचा वातावरण दिसून येते. आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन खूश करू शकता.

What Christmas gift is not recommended? Don't worry, give girlfriend 5 things for 100 rupees.. | ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

डिसेंबर महिना सुरू झाला की लोकांना ख्रिसमस आणि न्यू ईयरची चाहूल लागते. जगभरात २५ डिसेंबर रोजी ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणून साजरा करतात. 24 डिसेंबरच्या संध्याकाळपासून या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी लोक एकत्र येतात, ख्रिसमस ट्री सजवितात. एकमेकांना केक, पेस्ट्री, चॉकलेट देतात. यासह काही ना काही नवनवीन भेटवस्तू देतात. या खास दिवशी जर आपल्या प्रियजनांसाठी काही खास भेटवस्तू द्यायचे असेल तर १०० रुपयांच्या आत या काही भेटवस्तू आपण देऊ शकता. स्वस्तात मस्त या भेटवस्तू पाहून तुमची पत्नी, मैत्रीण अथवा गर्लफ्रेंड नक्कीच खूश होईल यात शंका नाही.

चॉकलेट

बहुतांश महिलांना चॉकलेट प्रचंड आवडतात. या ख्रिसमसला आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन खूश करू शकता. आवडते चॉकलेट त्यांना सरप्राइज करा. चॉकलेट पाहून ती व्यक्ती नक्कीच आनंदी होईल. १०० रुपयांच्या आत चांगले चॉकलेट येते, आपल्या प्रियजनांना या गिफ्टने खूश करा.

गुलाबाचे फुल

अनेकदा प्रेम व्यक्त करताना लोक जोडीदाराला गुलाबाचे फूल देतात. गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाब देऊ शकता. 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक गुलाबाचे फूल येते, किंवा पुष्पगुच्छही देऊ शकता. 

इयररिंग्स

प्रत्येक मुलीला नटायला खूप आवडते. सगळं काही मॅचिंग परिधान करायला त्यांना प्रचंड आवडते. ख्रिसमसमध्ये जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला कमी बजेटमध्ये गिफ्ट द्यायचे असेल, तर तुम्ही कानातले देऊ शकता. तुम्हाला कोणत्याही स्थानिक बाजारात १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत झुमके, कानातले, लाँग इयररिंग्स इ. मिळू शकतात. अथवा ऑनलाइन शॉपिंगद्वारे देखील तुम्ही बजेटमध्ये गर्लफ्रेंडसाठी झुमके खरेदी करू शकता.

पेपर स्प्रे

जर गर्लफ्रेंडच्या सुरक्षेची चिंता असेल, तर त्यांना अशी भेटवस्तू द्या ज्याने ते स्वतःचे संरक्षण करू शकतील. आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी खूप उपयुक्त देखील ठरेल. आपण पेपर स्प्रे, किंवा स्टन गन भेट म्हणून देऊ शकता. त्यांच्या सुरक्षेच्या संबंधित ही एक चांगली भेटवस्तू असेल. पेपर स्प्रे ऑनलाइन किंवा दुकानात कमी पैशात उपलब्ध आहेत.

बॅग

स्थानिक बाजारपेठेत किंवा कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवर, तुम्हाला हँडबॅग किंवा लेडीज वॉलेट 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल. अशा स्वस्त आणि उपयुक्त बॅग नाताळच्या दिवशी मैत्रिणींनाही भेट म्हणून देता येतील.

Web Title: What Christmas gift is not recommended? Don't worry, give girlfriend 5 things for 100 rupees..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.