Lokmat Sakhi >Relationship > त्याने किंवा तिने अचानक ब्रेकअप केलं तर काय कराल? प्रेम असेल तर रडण्या- चिडण्यापेक्षा करा ५ गोष्टी

त्याने किंवा तिने अचानक ब्रेकअप केलं तर काय कराल? प्रेम असेल तर रडण्या- चिडण्यापेक्षा करा ५ गोष्टी

Relationship Breakup अनेकवेळा जोडीदार अचानक नाते संपुष्टात आणतो, नात्यासाठी विनवणी करण्यापेक्षा समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 07:56 PM2022-11-09T19:56:25+5:302022-11-09T19:57:11+5:30

Relationship Breakup अनेकवेळा जोडीदार अचानक नाते संपुष्टात आणतो, नात्यासाठी विनवणी करण्यापेक्षा समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी

What if he or she breaks up suddenly? If there is love, do 5 things instead of crying and getting angry | त्याने किंवा तिने अचानक ब्रेकअप केलं तर काय कराल? प्रेम असेल तर रडण्या- चिडण्यापेक्षा करा ५ गोष्टी

त्याने किंवा तिने अचानक ब्रेकअप केलं तर काय कराल? प्रेम असेल तर रडण्या- चिडण्यापेक्षा करा ५ गोष्टी

ir="ltr">सध्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडीदारांमध्ये काही मतभेद झाले की ब्रेकअप होतो. समजून न घेणे, ऐकून न घेणे, समोर असलेल्या व्यक्तीची बाजू न पाहून घेणे, संशय घेणे अशा बारीकसारीक गोष्टी होत असतात. त्यामुळे अनेक जण रिलेशनशिप संपवतात. मात्र, कधी कधी कारण नसतानाही आपला जोडीदार ब्रेकअप करतो. याचा थेट परिणाम समोर असलेल्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि मनावर देखील पडतो. अनेकवेळा जोडीदार ब्रेकअपबद्दल पार्टनरसह बोलतो तेव्हा समोरचा पार्टनर खूप भावूक होतो आणि नातं टिकवण्यासाठी त्यांच्यासमोर विनवणी करू लागतो. त्यावेळी जोडीदार, समोरच्या व्यक्तीचा विचार न करता ब्रेकअप करून नाते संपुष्टात आणतो. अशा परिस्थितीत, जर आपल्या पार्टनरने अचानक ब्रेकअपचा विषय काढला तर काय केले पाहिजे आणि काय नाही याची माहिती जाणून घ्या.

शांत डोक्याने विचार करा

जर जोडीदाराला ब्रेकअप करायचे असेल तर त्या व्यक्तीला तुमच्यापासून वेगळे का व्हायचे आहे, हे शांत डोक्याने विचारा आणि चर्चा करा. ब्रेकअपचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराचा दृष्टीकोन किंवा त्यांचा प्रतिसाद तुम्हाला नात्यात पुढे जायचे आहे की नाही ही मुख्य गोष्ट कळून येईल. ब्रेकअपचे मूळ कारण शोधून काढा आणि त्यावर विचार करा, त्यांना जर मुळातच सोबत राहायचे नसेल तर आपण देखील नाते संपुष्टात आणणे योग्य ठरेल.

ब्रेकअपचे कारण शोधा

ब्रेकअपचे कारण जाणून घेऊन तुम्ही नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वाटत असेल की, ब्रेकअपचे कारण सोडवता येईल, तर नाते टिकवून ठेवण्याची संधी मिळेल. हे मुख्य कारण तुमचे नाते तुटण्यापासून वाचवू शकते. आणि पुन्हा एकदा नव्याने रिलेशनशिप सुरु होईल.

जोडीदाराचा नात्याबाबत दृष्टीकोन समजून घ्या

 

नातं वाचवायचे आहे अशी भावना जोडीदारानेही नात्याबाबत विचार केला. तर नक्कीच रिलेशनशिप ब्रेकअप पासून वाचेल. जर तुमचा पार्टनर तुमचे ऐकायला तयार नसेल तर समजून घ्या की तुमच्या कितीही प्रयत्नांनंतरही ती व्यक्ती रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित नाही. त्यामुळे जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेऊन नात्यासाठी प्रयत्न करा.

नातं टिकवण्यासाठी जबरदस्ती करू नये

अनेकदा लोकं ब्रेकअप सहन करू शकत नाहीत आणि जोडीदारासोबतचे नाते संपुष्टात येऊ नये म्हणून विनवणी करू लागतात. कारण जाणून न घेता, स्वतःचा गैरसमज करून माफी मागू लागतात आणि जोडीदारावर भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. नातं टिकवण्यासाठी असं अजिबात करू नका. स्वतःचा स्वाभिमान देखील तितकाच महत्वाचं आहे.

Web Title: What if he or she breaks up suddenly? If there is love, do 5 things instead of crying and getting angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :relationshipRelationship Tipsरिलेशनशिपरिलेशनशिप